वेलिंग्टन: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाअखेर भारताने ५ बाद १२२ धावा केल्या. भारतीय डावात कर्णधार विराट कोहलीने फक्त २ धावा करून बाद झाला. कर्णधार म्हणून विराटच्या नावावर असा एक विक्रम नोंदला गेला आहे जो त्याला कधीच आठवू नये असे वाटेल. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय डावाची सुरूवात अत्यंत खराब झाली. सलामीची जोडी, त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कोहली झटपट बाद झाले. विराट ७ चेंडूत २ धावांवर माघारी परतला. भारतीय कर्णधाराद्वारे न्यूझीलंडविरुद्धची ही दुसऱ्या क्रमांकाची खराब कामगिरी आहे. वाचा- भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने न्यूझीलंडमधील पहिल्या कसोटी डावात २ धावा केल्या होत्या. त्याआधीच्या कर्णधारांचा विचार केल्यास नवाब पटौदी ११, सुनील गावसकर नाबाद ३५, बिशन सिंह बेदी ३०, मोहम्मद अझरुद्दीन ३० आणि विरेंद्र सेहवागने २२ धावा केल्या होत्या. वाचा- भारतीय कर्णधाराद्वारे पहिल्या डावात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम महेंद्र सिंह धोनीच्या नावावर आहे. धोनीने न्यूझीलंडमधील पहिल्या कसोटी (१८ मार्च २००९) डावात १२३ चेंडूत ४७ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर सुनिल गावसकर आहेत. त्यांनी नाबाद ३५ धावा केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37I5bvj
No comments:
Post a Comment