Ads

Saturday, February 22, 2020

भारताकडून विराटसह ४ जण खेळणार आशियाई संघात

नवी दिल्ली: बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आशियाई संघासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने चार भारतीय खेळाडूंची नावे पाठवली आहेत. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबर रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त आशियाई संघ विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन यांच्यात दोन टी-२० सामने होणार आहे. यासाठी बीसीसीआयने नावे पाठवली आहेत. भारताकडून या दोन सामन्यासाठी कर्णधार , शिखर धवन, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांची नावे पाठवण्यात आली आहेत. हो दोन्ही सामना १८ आणि २१ मार्च दरम्यान खेळवले जाणार आहेत. वाचा- कोणत्या खेळाडूंची नावे पाठवावीत याबद्दल सुरूवातीला संभ्रम होता. कारण आशियातील देश म्हणून पाकिस्तानचे खेळाडू देखील या सामन्यात खेळणार होते आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे दोन्ही देशांचे खेळाडू एकत्र खेळणार नाहीत असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. वाचा- बीसीसीआयचे सहाय्यक सचिव जयेश जॉर्ज यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानचे खेळाडू या सामन्यात खेळणार नाही. आम्हाला जी माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आशियाई संघात पाकिस्तानेच खेळाडू असणार नाहीत. हे देखील वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2v7D23t

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...