Ads

Saturday, February 8, 2020

दिग्गजांना मागे टाकत १५व्या वर्षी केला क्रिकेटमधील वर्ल्ड रेकॉर्ड

नवी दिल्ली: आयसीसी वर्ल्ड कप लीग-२ मधील एका सामन्यात नवा विश्वविक्रम नोंदला गेला आहे. नेपाळच्या किर्तीपूर क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात हा विक्रम झाला. वाचा- आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग-२ स्पर्धेतील अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात नेपाळच्या याने झळकावण्याचा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय वनडेत याआधी सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा विक्रम नेपाळच्या रोहित कुमार पौडेल याच्या नावावर होता. त्याने १६ वर्ष १४६ व्या दिवशी अमेरिकेच्या विरुद्ध अर्धशतक केले होते. तर कुशलने १५ वर्ष ३४० व्या दिवशी वनडेत अर्धशतक केले. याबाबत कुशलने भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज शाहीद आफ्रिदी यांना मागे टाकले. वाचा- कुशलने सहाव्या क्रमांकावर येत ४९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अर्थात त्यानंतर तो बाद देखील झाला. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने १६ वर्ष २१७ दिवसात तर सचिनने १७व्या वर्षी आंतरराष्ट्रीय वनडे मध्ये अर्धशतकी खेळी केली होती. कसोटीमध्ये सचिनने वयाच्या १६ व्या वर्षीच अर्धशतक केले होते. वाचा- अमेरिकेच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात नेपाळने ४९.२ षटकात सर्वबाद १९० धावा केल्या. कुशलसह बिनोद भंडारीने देखील अर्धशतक केले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39hTUD5

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...