Ads

Thursday, February 6, 2020

धोनीच्या हातची पाणीपुरी; व्हिडिओ व्हायरल!

माले: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कधी मैदानावर पुन्हा दिसेल याची सर्वजण वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कपनंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. धोनी भारतीय संघात नसला तरी अनेक कारणामुळे चर्चेत असतो. आता धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिकेटच्या मैदानावरील धोनीच्या कामगिरीचे अनेक तुम्ही पाहिले असतील. पण आता धोनीचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो क्रिकेटच्या मैदानावरील नसून चक्क पाणीपूरीच्या गाडीवरचा आहे. एका पाणीपूरीच्या गाडीवर धोनी चक्क पाणीपुरी तयार करतोय आणि त्याच्या मित्रांना खाण्यासाठी देतोय. मालदीवमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलेल्या धोनीने तेथील पाणीपूरीच्या गाडीवर मित्रांना स्वत:च्या हातची पाणीपुरी खायला घातली. धोनीने आरपी सिंह आणि पियूष चावला यांना दिली. हे तिन्ही खेळाडू एका कार्यक्रमासाठी मालदीवमध्ये गेले होते. वाचा- वाचा- क्रिकेटच्या मैदानापासून दूर गेलेल्या धोनी पुन्हा कधी येणार याची कोणतीच बातमी अद्याप आलेली नाही. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील धोनीच्या कमबॅकबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. धोनी ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप खेळणार का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. पण त्याआधी तो आयपीएलमध्ये पुन्हा एकदा चेन्नईचे नेतृत्व करताना दिसेल. वाचा- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या ऑल स्टार मॅचमध्ये धोनी खेळणार आहे. जर तसे झाले तर विराट कोहली, रोहित शर्मा हे दिग्गज पुन्हा एकदा धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/371vAnD

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...