Ads

Tuesday, February 4, 2020

वासिम जाफरच्या नावावर नोंदवला गेला महाविक्रम!

नागपूर: भारतीय क्रिकेटमध्ये स्पर्धेला एक वेगळे महत्त्व आहे. या स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या एका क्रिकेटपटूने रणजी स्पर्धेत नवा विक्रम केला आहे. विदर्भाकडून खेळणाऱ्या वासिम जाफरने रणजी स्पर्धेत आतापर्यंत कोणाला जमले नाही अशी कामगिरी केली आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या केरळविरुद्धच्या सामन्यात जाफरने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील १२ हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विशेष म्हणजे जाफर रणजी स्पर्धेत १५० वा सामना खेळत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जाफर मुंबई आणि विदर्भाकडून खेळतो. वाचा- जाफरने १९९६/९७ च्या हंगामात रणजी स्पर्धेत पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले. रणजी स्पर्धेत सर्वाधिक ४० शतकांचा विक्रम देखील जाफरच्या नावावर आहे. २०१८ मध्ये त्याने ११ हजार धावांचा टप्पा पार केला होता आणि आता स्वत:चा विक्रम मागे टाकत त्याने १२ हजार धावा केल्या. वाचा- जाफरने भारताकडून ३१ कसोटी सामन्यात ३४.१० च्या सरासरीने १ हजार ९४४ धावा केल्या आहेत. यात पाच शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. इतक नव्हे तर जाफरच्या नावावर दोन द्विशतकांची नोंद आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध २१२ तर पाकिस्तानविरुद्ध २०२ धावांची खेळी केली होती. वाचा- दरम्यान आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून देखील त्याने काम पाहिले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2GU9Mj0

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...