Ads

Thursday, January 23, 2020

शोएब बरळला, तुझ्या डोक्यावरील केसा पेक्षा माझ्याकडे अधिक पैसे!

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसात पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज याने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटपटूवर टीका केली आहे. यावेळी शोएबने पाकिस्तानमधील मुल्तानमध्ये त्रिशतक करणारा भारताचा फलंदाज विरेंद्र सेहवागवर आरोप केली की त्याला यश पचवता आले नाही. मी चार बातम्यांमुळे प्रसिद्ध झालो नाही. १५ वर्ष खेळल्यानंतर नाव कमावले आहे. राहता राहिला सेहवागचा प्रश्न तर त्याच्या डोक्यावर जितके केस आहेत. त्यापेक्षा अधिक पैसे माझ्याकडे आहेत, असे शोएब बरळला. शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मला आनंद आहे की मी जो बोलतो त्याला महत्त्व दिले जाते. पण असे फार कमी लोक आहेत ज्यांना मी सांगितलेली गोष्ट कळते. काही लोकांना वाटते की मी पैसे कमावण्यासाठी भारतीय क्रिकेट टीम, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे कौतुक करतो. पण जे माझ्यावर आरोप करतात त्यांना मी विचारतो, भारतीय संघ जगातील नंबर एकचा संघ आहे की नाही? विराट कोहली नंबर एकचा फलंदाज आहे की नाही? जर या प्रश्नांची उत्तरे होय असतील तर त्यांचे कौतुक करण्यास हरकत काय आहे, असे त्याने म्हटले आहे. वाचा- एका व्हिडिओमध्ये सेहवाग म्हणाला, मी पैसे कमवण्यासाठी भारताचे कौतुक करतो. सेहवाग कधीच गंभीरपणे बोलत नाही. त्याने ते वाक्य विनोदाने आणि मजेत म्हटले होते. पण सेहवागला हे माहिती असेल की, भारतात माझे चाहते आहेत. मी बांगलादेशमध्ये जातो तेव्हा मला पाहण्यासाठी वाहतूक थांबते. ऑस्ट्रेलियात मी १० सेंकद देखील एकटा राहू शकत नाही. चाहते मला घेरतात. त्यामुळेच मी सेहवागला सांगतो की, तुझ्या डोक्यावर जितके केस नाहीत. त्याहून अधिक पैसे माझ्याकडे आहेत. वाचा- शोएब अख्तर भारतीय खेळाडूंचे कौतुक करतोय, असा प्रश्न सेहवागला विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, भारतीय खेळाडूंचे कौतुक केल्याने शोएबचा फायदा होतो. अशा गोष्टी बोलल्यामुळे त्याला पैसे मिळतात. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RkKv7I

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...