ओव्हल: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. सहा आठवड्यांच्या या दौऱ्यात भारत ५ टी-२०, तीन वनडे आणि दोन कसोटी खेळणार आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठीचा संघ जाहीर झाला आहे. तर आज वनडे मालिकेसाठी संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली जात असताना वनडेसाठी पृथ्वी शॉचा विचार करता यासाठी संघाची घोषणा करण्यात आली नसल्याचे वृत्त होते. रणजी ट्रॉफीतील एका सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो फिट झाला आणि सध्या न्यूझीलंड दौऱ्यात भारताच्या अ संघाकडून खेळत आहे. दुखापतीतून बाहेर आलेल्या पृथ्वीने धडाकेबाज खेळी करत वनडे मालिकेसाठी आपण सज्ज असल्याचा इशारा दिला आहे. तसेच निवड समितीचा वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा न करण्याचा निर्णय योग्यच होता असे दाखवून दिले. वाचा- न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात पृथ्वी शॉने १०० चेंडूत २२ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १५० धावा केल्या. पृथ्वीच्या या खेळीमुळे भारताच्या अ संघाने प्रथम फलंदाजी करत ३७२ धावा केल्या. पृथ्वी बरोबरच विजय शंकरने अर्धशतकी खेळी केली. त्याने ४१ चेंडूत ५८ धावा केल्या. वाचा- दुखापतीच्या आधी पृथ्वी शॉवर डोपिंगमुळे आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर रणजी स्पर्धेत त्याने पुनरागमन केले. पण एका सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळेच न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सराव सामन्यात त्याला खेळता आले नाही. भारताचा मुख्य संघ २४ तारखेपासून न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यातील वनडे मालिकेत पृथ्वीचा विचार केला जाणार होता. पण पृथ्वीच्या दुखापती संघाची घोषणा पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2R80dCZ
No comments:
Post a Comment