कोलकाताः भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार याला भारतीय क्रिकेट मंडळाच्या () वार्षिक करारातून वगळण्यात आले असून, या प्रकरणी बोलण्यास अध्यक्ष यांनी नकार दिला आहे. इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. या पराभवानंतर धोनी भारताकडून खेळला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. महेंद्र सिंह धोनीला वार्षिक करारातून वगळण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सौरव गांगुली यांनी मौन बाळगले. मी याबाबत कोणतेही भाष्य करू शकत नाही, असे सौरव गांगुली यांनी सांगितले. बीसीसीआयने गुरुवारी खेळाडूंसोबतचे वार्षिक करार जाहीर केले. या करारातून धोनीला वगळण्यात आले. ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी क्रिकेटपटूंना देण्यात येणारे मानधन बीसीसीआयने जाहीर केले. याआधी धोनीचा समावेश 'ग्रेड ए'मध्ये होता. ९ जुलै २०१९ रोजी धोनी भारताकडून अखेरचा सामना खेळला आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले होते. धोनीने भारताकडून ९० कसोटी, ३५० वनडे आणि ९८ टी-२० सामने खेळले आहेत. या तिन्ही प्रकारात धोनीने १७ हजार धावा तर ८२९ विकेट घेतल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35ZUsLT
No comments:
Post a Comment