Ads

Saturday, January 11, 2020

सचिनला इतिहास घडवण्याची संधी; क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी नामांकन

लंडन: भारताचा महान क्रिकेटपटू भारतरत्न () याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाण्याची शक्यता आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च क्षणांमध्ये सचिनच्या एका फोटोचा समावेश झाला आहे. भारताने २०११मध्ये आयसीसी वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले होते. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. या विजेतेपदानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलत मैदानाची फेरी मारली होती. या क्षणाचा समावेश सर्वोत्कृष्ठ क्रीडा लॉरेन्स पुरस्काराच्या ()नामांकनामध्ये झाला आहे. वाचा- सचिन तेंडुलकरला सहकाऱ्यांनी खांद्यावर घेतलेल्या क्षणाला 'कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन' असे शिर्षक देण्यात आले आहे. आजपासून ९ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने त्याच्या सहाव्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच चषक उंचावला होता. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संघातील सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर घेत 'लॅप ऑफ ऑनर' दिला होता. अनेक वर्ष देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिनला तेव्हा आश्रू रोखता आले नव्हते. वाचा- लॉरेन्स अकादमीचा सदस्य आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने सचिन तेंडुलकर संदर्भातील या क्षणाला क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षण असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाने जिंकला होता पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या संघाने २००२मध्ये लॉरेन्स अकादमीचा पुरस्कार जिंकला होता. हा आमच्यासाठी सर्वात शानदार खेळ आहे. लॉरेन्स पुरस्कारासाठी नामांकन मिळणे ही फार अवघड गोष्ट असते. भारतीय संघाने २०११मध्ये वर्ल्ड कप जिंकणे ही शानदार अशी कामगिरी होती. आम्ही २००२मध्ये सर्वोत्तम संघाचा लॉरेन्स पुरस्कार मिळवला होता तो क्षण देखील असाच होता, असे वॉने पीटीआयशी बोलताना सांगितले. वाचा- येत्या १७ फेब्रुवारी रोजी बर्लिन येथे लॉरेन्स जागतिक क्रीडा पुरस्कार दिले जाणार आहेत. गेल्या २० वर्षातील (२०००-२०२०) सर्वोत्तम क्रीडा क्षण निवडण्यासाठी क्रीडा चाहते देखील मत देऊ शकतात. यासाठीचे मतदान १० जानेवारी ते १६ जानेवारी दरम्यान होणार आहे. हे देखील वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36LhYNQ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...