Ads

Saturday, January 11, 2020

राहुल द्रवीडच्या नावावर आहेत हे भन्नाट रेकॉर्ड!

नवी दिल्ली: भारतीय संघातील 'द वॉल' असलेल्या राहुल द्रवीडचा आज ४७वा वाढदिवस आहे. ११ जानेवारी १९७३ रोजी जन्मलेल्या द्रवीडने १६ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी भूमिका पार पाडली ज्याची नोंद जागतिक क्रिकेटमध्ये घेतली गेली. तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी फलंदाज असलेला द्रवीड कधीच नियमित विकेटकीपर नव्हता पण जेव्हा संघाला गरज वाटली तेव्हा त्याने विकेटकीपर म्हणून जबाबदारी पार पाडली. जाणून घेऊयात द्रवीड बद्दलच्या काही खास गोष्टी... >> राहुल द्रवीडने वयाच्या १२व्या वर्षी खेळण्यास सुरुवात केली. एका मराठी घरात जन्मलेल्या राहुल बेंगळुरूमध्ये मोठा झाला. त्याने १५ वर्षाखालील, १७ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील कर्नाटकच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले. ३ एप्रिल १९९६ रोजी द्रवीडने भारतीय संघाकडून वनडे तर त्याच वर्षी २० जून रोजी कसोटीत पदार्पण केले. वाचा- >> भारत सरकारने राहुल द्रवीडला पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत द्रवीड चौथ्या क्रमांकावर आहे. कसोटीत सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम द्रवीडच्या नावावर आहे. १६ वर्षाच्या करिअरमध्ये द्रवीडने ३१ हजार २५८ चेंडू खेळले आहेत. तर ७३६ तास त्याने बॅटिंग केली असून हा एक जागतिक विक्रम आहे. >> कोणत्याही संघाविरुद्ध आणि प्रतिकूल परिस्थितीत धावा करण्याचे द्रवीडचे सर्वात खास असे वैशिष्ट होते. द्रवीड जगातील असा पहिला फलंदाज ठरला होता, ज्याने कसोटी खेळणाऱ्या सर्व संघांविरुद्ध शतक झळकावले. >> कसोटी सामन्यात सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले की द्रवीड द वॉल म्हणू्न खेळपट्टीवर थांबायचा. एका बाजूला द्रवीड संयमी खेळी करत असताना दुसऱ्या बाजूला अनेक फलंदाज बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये जात असल्याचे अनेक वेळा घडले आहे. वाचा- >> कसोटी क्रिकेटमध्ये क्रमांक तीनवर खेळत असताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम द्रवीडच्या नावावर आहे. त्याने तिसऱ्या क्रमांकावर ५२च्या सरासरीने १० हजार ५२४ धावा केल्या आहेत. >> भारतीय संघातील खेळाडू द्रवीडला जॅमी म्हणून हाक मारतात. द्रवीड फक्त स्वत: मोठ्या धावा करत नाही तर मोठी भागीदारी करण्यात देखील त्याच वाटा असायचा. ३२ हजार ०३९ धावांची भागिदारी करण्याचा विक्रम द्रवीडच्या नावावर आहे. त्याने ५०हून अधिक धावांची १२५ वेळा तर १००हून अधिक धावांची ८८ वेळा भागिदारी केली आहे. >> फील्डर म्हणून १६४ कसोटीत त्याने २१०हून अधिक कॅच पकडले आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. >> कसोटी क्रिकेटमध्ये द्रवीड एकदाही 'गोल्डन डक'वर बाद झाला नाही. आयसीसीने २००४मध्ये त्याला 'प्लेअर ऑफ द इयर' आणि 'टेस्ट प्लेअर ऑफ द इअर' हा सन्मान दिला होता. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TdZ9iE

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...