मुंबई: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या मयांक अग्रवालचं महान फलंदाज यांनी कौतुक केलं आहे. भारतीय संघाचा सलामीवीर येत्या वर्षातही चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे, असं गावसकर म्हणाले. मयांकसमोर कामगिरीत सातत्य राखण्याचं आव्हान आहे. कारण प्रतिस्पर्धी संघांना त्याच्याबद्दल बरंच काही माहीत झालं आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा सलामीवीर मयांक अग्रवालनं आपल्या फलंदाजीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. त्यानं आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावा केल्या. २४३ धावांची त्यानं खेळी केली. या द्विशतकी खेळीमुळं त्याच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनीही त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. भारतीय संघाचा हा सलामीवीर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षीही चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे, असं गावसकर म्हणाले. यावेळी त्यांनी अग्रवालला सावधगिरीचा सल्लाही दिला. फलंदाजीत सातत्य राखण्याचे आव्हान मयांकसमोर असेल. कारण आता प्रतिस्पर्धी संघांना त्याच्याबद्दलच्या सर्व गोष्टी माहीत झाल्या आहेत, असंही ते म्हणाले. ' सध्या कसोटी क्रिकेटचा आनंद लुटत आहे. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचं पहिलं वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षीही तो दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. आता प्रतिस्पर्धी संघांकडे त्याच्याबद्दल बरीच माहिती असेल. पण मयांक दमदार फलंदाजी करत आहे यात शंकाच नाही,' असं ते म्हणाले. मयांक फलंदाजी करताना ऑफ साइडला न झुकता चांगले संतुलन राखतो आणि स्ट्रेट खेळतो. फ्रंट आणि बॅकफूटवर त्याची मुव्हमेंट उत्तम आहे. त्यामुळं तो फार्मात आहे. त्याचा आत्मविश्वासही वाढला आहे, असंही ते म्हणाले. मयांक सध्या जबरदस्त फार्मात आहे. याआधी त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत एका द्विशतकासह दोन शतके झळकावली होती. आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यानं २४३ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35hlZIY
No comments:
Post a Comment