नवी दिल्ली: बेंगळुरूत दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात मैदानात केलेल्या गैरवर्तनामुळं आंतरराष्ट्रीय परिषदेनं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला समज दिली आहे. तसंच आयसीसीचा नियम भंग केल्याप्रकरणी त्याला नकारात्मक गुणही दिला आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, दोन वर्षात एखाद्या खेळाडूला चार नकारात्मक गुण मिळाल्यास त्याच्यावर बंदीची कारवाईही होऊ शकते. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या टी-२० सामन्यात धाव काढताना ब्युरेन हेंड्रिक्सला जाणूनबुजून धक्का दिल्याप्रकरणी विराटला दोषी ठरवण्यात आलं आहे. सप्टेंबर २०१६मध्ये आयसीसीचे नवे नियम लागू झाल्यानंतर विराटच्या खात्यात तिसऱ्यांदा नकारात्मक गुणाची भर पडली आहे. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता आणि सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या ९ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर विराट मैदानात उतरला. ब्यूरन हेंड्रिक्सच्या चेंडूवर तो एक धाव घेत होता. हेंड्रिक्स त्याच्या वाटेत आला. विराटनं खांदा मारून त्याला बाजूला केलं होतं. या प्रकरणी विराटला आयसीसीचा नियमभंग केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. त्याला समज देण्यात आली असून, नकारात्मक गुणही देण्यात आला आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, दोन वर्षांच्या कालावधीत एखाद्या खेळाडूला चार नकारात्मक गुण (डिमेरिट पॉइंट्स) मिळाल्यास तो एक सस्पेन्शन पॉइंट मानला जातो. अशा परिस्थितीत आयसीसीकडून कोणत्याही खेळाडूवर बंदी घातली जाऊ शकते. दोन सस्पेन्शन पॉइंट झाल्यास एक कसोटी किंवा वनडे, अथवा दोन टी-२० सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळं विराटच्या खात्यात आणखी एका नकारात्मक गुणाची भर पडली तर त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. >> संबंधित बातम्या
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2kL4ZZZ
No comments:
Post a Comment