बेंगळुरू: दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीनं भारतीय संघातील सहकाऱ्यांना यशाचा नवा मंत्र दिला आहे. तुम्ही सुरक्षित भावनेतून बाहेर पडून जोखीम पत्करावी. जोखीम पत्करल्याशिवाय संघ नीडर होऊच शकत नाही, असं तो म्हणाला. आयपीएल कारकीर्दीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचं नेतृत्व करणाऱ्या विराटला एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीची वैशिष्ट्ये आणि उणिवा ठाऊक आहेत. तरीही त्याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध अखेरच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात संघ पराभूत झाला. त्यानंतर विराटनं त्यावर स्पष्टीकरणही दिलं. संघानं सुरक्षित भावनेतून बाहेर पडून जोखीम पत्करायला हवी. कारण जोखीम घेतल्याशिवाय संघ निर्भय होऊ शकत नाही, असं तो म्हणाला. आपल्याला जोखीम घ्यावीच लागेल. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला जोखीम ही घ्यावीच लागते. जोपर्यंत खेळ सुरू होत नाही, तोपर्यंत काहीही ठरलेलं नसतं. अनुकूल परिस्थितीतून बाहेर पडून खेळण्याची तुमची तयारी असेल तर नाणेफेकीवेळी काय घडलं याची भीती वाटणार नाही. नेमकं हेच करण्याचा आमचा विचार आहे, असंही तो म्हणाला. भारतीय संघाचा फलंदाजी क्रम तळापर्यंत आहे. याबाबत विराट म्हणाला, 'आमचे ९व्या स्थानापर्यंत फलंदाज आहेत. त्यामुळं ज्यांना खेळवणं शक्य आहे, त्यांना खेळवण्याचा प्रयत्न केला. प्रथम फलंदाजी करा अथवा गोलंदाजी करा, तुम्ही चांगल्या स्थितीत आहात हे तुम्हाला माहीत असतं. मानसिकरित्या तुम्ही स्वतःला या परिस्थितीत घेऊन गेलात तर, कोणत्याही परिस्थितीत खेळण्याची तुमची तयारी असते.' >> संबंधित बातम्या
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2kDbM7M
No comments:
Post a Comment