Ads

Tuesday, April 27, 2021

IPL 2021 CSK vs RCB: आता हिंदीत बोलू शकत नाही, पाहा धोनी असे का म्हणाला; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या १४व्या हंगामात आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. या पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवत चेन्नईने ८ गुणांसह गुणतक्त्यात सर्वोत्तम सरासरीसह पहिले स्थान मिळवले आहे. वाचा- चेन्नईने आयपीएलमधील १९व्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६९ धावांनी पराभव केला. या विजयात रविंद्र जडेजाने धमाकेदार कामगिरी केली. जडेजाने २८ चेंडूत नाबाद ६२ धावा केल्या. तर गोलंदाजीत चार षटकात १३ धावा देत ३ विकेट घेतल्या. या शिवाय फिल्डिंगमध्ये एकाला धावबाद देखील केले. वाचा- जडेजाने ज्या खेळाडूंना बाद केले त्याच स्फोटक ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स यांचा समावेश होता. या सामन्यात धोनीच्या सल्ल्यामुळे अखेरच्या षटकात ३७ धावा करता आल्याचे जडेजाने सांगितले. धोनीने २०व्या षटकात हर्षल पटेल कशी गोलंदाजी करेल हे जडेजाला सांगितले होते. त्यानंतर गोलंदाजी करताना देखील धोनीने जडेजाला विकेटच्या मागून अनेक सल्ले दिले होते. जेव्हा तो मॅक्सवेलला गोलंदाजी करत होता तेव्हा धोनीने दिलेल्या सल्ल्यानंतर जडेजाला विकेट मिळाली. वाचा- ... जेव्हा जडेजाने मॅक्सवेल आणि एबीला बाद केले तेव्हा हर्षल पटेल फलंदाजी करण्यासाठी आला. हर्षल फलंदाजी करत असताना धोनीने जडेजाला सांगितले की, आता मी हिंदीत बोलू शकत नाही. जेव्हा मॅक्सवेल आणि एबी फलंदाजी करत होते तेव्हा धोनी हिंदीत बोलत होता. पण हर्षलला हिंदी समजत असल्याने धोनीला आता हिंदीत बोलता येत नव्हते. या घटनेचा व्हिडिओ एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो खुप व्हायरल होत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3t443gt

IPL 2021: कोणी खेळाडू देता का खेळाडू! या संघावर खेळाडू उधार मागण्याची वेळ आली

मुंबई : दुखापत, बायो बबलमुळे आलेला थकवा आणि भारतात करोना रुग्णांची वाढती संख्या या कारणांमुळे चार विदेशी खेळाडूंनी आयपीएलचा १४वा हंगाम सुरू असताना माघार घेतल्याने राजस्थान रॉयल्सचा संघ अडचणीत आला आहे. आयपीएलच्या चालू हंगामातील अद्याप निम्म्या लढती देखील झाल्या नाही. स्पर्धेचा मोठा कालावधी शिल्लक असताा राजस्थान संघावर दुसऱ्या संघांकडून खेळाडू उधार घेण्याची वेळ आली आहे. वाचा- राजस्थान रॉयल्सचा संघ या वर्षी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या संघाकडून खेळणारे बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाले आहेत. तर लियाम लिव्हिंगस्टोने बायो बबलमुळ थकवा आल्याचे कारण देत माघार घेतली. तर रविवारी एड्यू टायने भारतात कोरना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑस्ट्रेलियात परत जाण्याचा निर्णय घेतला. या चार खेळाडूंनी माघार घेतल्याने संघाची अवस्था बिकट झाली आहे. वाचा- संघातील एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेतील उर्वरित सामने खेळण्यासाठी अन्य संघाकडू खेळाडू उधार घेण्याची आमची योजना आहे. यासंदर्भात आम्ही अन्य संघांशी संपर्क केला आहे. पण सध्या याबाबत काही ठरवण्यात आले नाही. वाचा- आयपीएलमध्ये खेळाडूंना अन्य संघांकडून घेण्याचा कालावधी सोमवारपासून सुरू झाला आहे. जो साखळी फेरीतील सामने संपेपर्यंत सुरू असेल. आयपीएलच्या नियमानुसार कमीत कमी दोन सामने खेळणाऱ्या खेळाडूला दुसरा संघ स्वत:कडे घेऊ शकतो. राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन लढतीत त्यांचा विजय झालाय. आता गुरुवारी त्यांची लढत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sUxvFm

IPL 2021: मादेशात जाण्यासाठी चार्टर विमानाची सोय करा, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची मागणी

मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात अनेक परदेशी खेळाडूंनी स्पर्धेच्या मधूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. यात अधिकतर खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत. सोमवारी ज्या खेळाडूंनी मायदेशात जाण्याचा निर्णय घेतला ते खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्याकडून खेळतात. आता मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या एका खेळाडूने आपल्या देशातील बोर्डाला चार्टर प्लेनची सोय करण्याची मागणी केली आहे. वाचा- मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या या खेळाडूने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विनंती केली आहे की त्यांनी खेळाडूंना घेऊन जाण्यासाठी चार्टर विमानाची सोय करावी. लीन म्हणाला, या संदर्भात मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला एक पत्र लिहले आहे. खेळाडू प्रत्येक वर्षी कराराच्या माध्यमातून १० टक्के पैसे कमावतात. आमच्याकडे या पैशाचा या वर्षात वापर करण्याची संधी आहे. जेव्हा ही स्पर्धा संपेल तेव्हा चार्टर विमानाची सोय करावी. वाचा- मला कल्पना आहे की असे लोक आहेत ज्यांची परिस्थिती आमच्यापेक्षा अधिक वाइट आहे. पण आमचे बायो बबल देखील खुप कडक आहे. पुढील आठवड्यात आम्हाला कोव्हिडची लस मिळण्याची शक्यता आहे. तरी देखील आम्हाला आशा आहे की, सरकार एका खासगी चार्टर विमानाची व्यवस्था करेल. वाचा- मी आयपीएलचा कालावधी कमी करा असे म्हणणार नाही. कारण या धोक्याची कल्पना सर्वांना पहिल्या पासून होती आणि त्यानंतरच आम्ही कराराव स्वाक्षरी केली. माझे फक्त इतकेच म्हणणे आहे की, स्पर्धा संपल्यानंतर घरी परतण्यासाठी विमानाची सोय केल्यास बरे होईल, असे लीन म्हणाला. बायो बबलमध्ये मला सुरक्षित वाटत आहे आणि यातून बाहेर पडण्याचा विचार मी करत नाही. भारत सध्या कठिण कालावधीतून जात आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही काही लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहोत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dQMJHg

IPL 2021 DC vs RCB: गुणतक्त्यात कोणाला मिळणार अव्वल स्थान; आज पंत विरुद्ध विराट यांच्यात लढत

अहमदाबाद: आयपीएलच्या १४व्या हंगामात आज दिल्ली कॅपिटल्स () आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ( ) या दोन संघामध्ये लढत होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही लढत होणार असून दोन्ही संघात गुणतक्यातील अव्वल स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा असेल. वाचा- ... गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीचा विजय रथ रोखला होता. तर दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता. वाचा- दिल्लीच्या विरुद्ध आरसीबीला मधळ्या फळीतील फलंदाजी चांगली करावी लागणार आहे. सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तर ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांनी देखील चांगली फटकेबाजी केली आहे. पण मधळ्या फळीतील फलंदाजांनी निराश केले आहे. पॉवर प्ले आणि डेथ ओव्हरच्या मध्ये आरसीबीला धावा करण्यात अपयश आलय. दिल्लीविरुद्ध ही कमकूवत बाजू आरसीबीची डोकेदुखी ठरू शकते. दिल्लीकडे अमित मिश्रा, अक्षर पटेल सारखे शानदार गोलंदाज आहेत जे धावा रोखण्यासोबत विकेट देखली घेतात. वाचा- चेन्नई विरुद्धच्या सामन्यात बेंगळुरूचा जलद गोलंदाज हर्षल पटेल याला रविंद्र जडेजाने एका षटकात ३७ धावा मारल्या होत्या. त्या एका ओव्हरमुळे सामन्याचे चित्रच बदलले. हर्षल या हंगामातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याच बरोबर मोहम्मद सिराज आणि कायले जेमीसन यांना देखील चांगली कामगिरी करावी लागले. फिरकीपटूंमध्ये युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासमोर कमी धावा देण्याचे आव्हान असेल. दिल्लीचा विचार केल्यास शिखर धवनने मालिकेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. सोबत पृथ्वी शॉ देखील आक्रमक फलंदाजी करतोय. मधळ्या फळीत ऋषभ पंत, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टायोनिस आणि शिमरॉन हेटमायर असे फलंदाज आहेत. संभाव्य संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅन ख्रिस्टीन, वॉशिंग्टन सुंदर, कायले जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल. दिल्ली कॅपिटल्स- शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, ऋषभ पंत(कर्णधार), शिमरॉन हेटमायर, मार्क स्टायोनिस, अक्षर पटेल, ललित यादव, कगिसो रबाडा, अवेश खान, अमित मिश्रा


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nmc0fC

Monday, April 26, 2021

IPL 2021 : तळाच्या केकेआरने विजयासह गुणतालिकेत केला मोठा बदल, पाहा कितवे स्थान पटकावले...

अहमदाबाद : कोलकाता नाइट रायडर्सने आज पंजाब किंग्सवर विजय मिळवला. या विजयासह गुणतालिकेत तळाला असलेल्या केकेआरने गुणतालिकेत मोठा बदल केल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यापूर्वी केकेआरचा संघ हा गुणतालिकेत आठव्या स्थानावर होता. पण या विजयानंतर गुणतालिकेत त्यांची मोठी झेप घेतली आहे. या सामन्यापूर्वी केकेआरच्या संघाने पाच सामने खेळले होते आणि त्यांना चार सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे एका विजयामुळे त्यांना गुणतालिकेत आठवे स्थान पत्करावे लागले होते. पण या विजयानंतर मात्र केकेआरने गुणतालिकेत मोठा बदल करत पाचवे स्थान पटकावले आहे. या सामन्यापूर्वी पंजाबचा संघ हा पाचव्या स्थानावर होता आणि पराभवानंतर त्यांची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. पंजाबच्या १२४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. केकेआरची पहिल्या तीन षटकांमध्येच ३ बाद १७ अशी दयनीय अवस्था झाली होती. यावेळी प्रत्येक षटकात केकेआरले प्रत्येकी एक धक्का बसला होता. पण त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि कर्णधार इऑन मॉर्गन यांच्यामध्ये चौथ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी झाली आणि त्यांनी केकेआरच्या संघाची पडझड थांबवली. ही जोडी आता केकेआरला विजय मिळवून देईल, असे वाटत होते. पण त्यावेळी एक चुकीचा फटका त्रिपाठीने खेळला आणि तो बाद झाला. त्रिपाठीने यावेळी ३२ चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर ४१ धावांची खेळी साकारली. त्रिपाठी बाद झाल्यावर आंद्रे रसेल फलंदाजीला आला. पण यावेळी गरज नसताना रसेल चोरटी धाव घ्यायला गेला आणि धावचीत झाला. रसेलला यावेळी १० धावांवर समाधान मानावे लागले. कोलकाताने यावेळी नाणेफेक जिंकली आणि पंजाबला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. यावेळी पंजाबच्या सलामीवीरांनी संयत सुरुवात केली खरी, पण पहिली विकेट पडल्यावर मात्र एकामागून एक त्यांचे फलंदाज बाद होत गेले. पंजाबचा कर्णधार लोकुश राहुल हा १९ धावांवर बाद झाला आणि त्यांच्या संघाला पहिला धक्का बसला. राहुल बाद झाल्यावर पंजाबचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले. ख्रिस गेलला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. धडाकेबाज फलंदाज दीपक हुडाला यावेळी एका धावेवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर मोइसेस हेनरिक्स आणि शाहरुख खान यांनाही मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. पण ख्रिस जॉर्डनने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केल्यामुळे पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. जॉर्डनने यावेळी १८ चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३० धावा केल्या. केकेआरकडून यावेळी सर्वाधिक तीन विकेट्स या वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णनने घेतल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gF3t61

IPL 2021 : हैदराबादच्या पराभवानंतर वीरेंद्र सेहवाग भडकला, म्हणाला 'हा' खेळाडू ****ला गेला होता का...

मुंबई : डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादला सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. या सुपर ओव्हरनंतर भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग चांगलाच भडकलेला आहे. त्याचबरोबर एका खेळाडूला न खेळवल्याबद्दल सेहवागने जहरी टीकाही केली आहे. सुपर ओव्हरमध्ये हैदराबादच्या संघाने तुफानी फटकेबाजी करणाऱ्या खेळाडूला संधीच दिली नाही आणि त्यामुळेच सेहवाग चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने फक्त १८ चेंडूंत ३८ धावांची वादळी खेळी साकारली होती. पण हैदराबादच्या संघाने सुपर ओव्हरमध्ये त्याला फलंदाजीची संधीच दिली नाही. सुपर ओव्हरमध्ये कर्णधार वॉर्नर आणि केन विल्यम्सन हे फलंदाजीला आले आणि त्यांना फक्त सात धावाच करता आल्या. सेहवाग भडकल्यावर नेमकं काय म्हणाला, पाहा...हैदराबादच्या पराभवानंतर सेहवाग म्हणाला की, " जॉनी बेअरस्टो हा टॉयलेटमध्ये गेला असेल त्यामुळेच त्याला सनरायझर्स हैदराबादच्या संघाने सुपर ओव्हरमध्य फलंदाजीची संधी दिली नसावी. जॉनीने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात फक्त १८ चेंडूंत ३८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. त्याचे फटके थेट मैदानाबाहेर जात होते. हैदराबादने या सामन्यात चांगली लढत दिली. पण त्यांनी बेअरस्टोला फलंदाजीला सुपर ओव्हरमध्ये उतरवले नाही आणि हीच त्यांची सर्वात मोठी चुक घडली." वॉर्नरकडून घडली ही मोठी चुक...या सामन्यातील सुपर ओव्हरमध्ये वॉर्नरकडून एक चुक घडल्याचे पाहायला मिळाले. या एका चुकीमुळे हैदराबादला पराभवचा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. सुपर ओव्हरमध्ये वॉर्नर हा फलंदाजी करायला आला होता. अक्षर पटेल दिल्लीकडून सुपर ओव्हरचे षटक टाकत होता. या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर वॉर्नरने दोन धावा घेतल्या. त्यामुळे सुरुवातीला दिल्लीपुढे ९ धावांचे आव्हान असल्याचे सांगण्यात आले. पण काही वेळाने तिसऱ्या पंचांनी वॉर्नरची एक मोठी चुक यावेळी दाखवून दिली आणि दिल्लीचे आव्हान आठ धावांचे ठेवण्यात आले. वॉर्नर जेव्हा दोन धावा घेण्यासाठी पळाला. तेव्हा पहिला धाव काढता त्याला पूर्ण धाव घेता आली नाही. कारण यावेळी क्रिझच्या आतमध्ये बॅट न आणता तो दुसरी धाव घेण्यासाठी धावला आणि हीच चुक हैदराबादच्या संघाला चांगली भोवली. या एका चुकीमुळे हैदराबादची एक धाव कमी झाली. दिल्लीला सुपर ओव्हरमध्ये अखेरच्या चेंडूवर फक्त एक धाव विजयासाठी हवी होती. तो चेंडू मिस झाला आणि पण दिल्लीला एक धाव घेता आली. त्यावेळी जर दिल्लीला दोन धावा हवा असल्या असत्या आणि त्यांनी जर एकच धाव घेतली असती तर हा सामना पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये गेला असता. त्यामुळे दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पुन्हा एकदा हैदराबादच्या विजयाची शक्यता वाढू शकली असती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aFNe57

Punjab vs Kolkata Scorecard Update IPL 2021 : कोलकाताच्या संघाने नाणेफेक जिंकली, पाहा काय घेतला निर्णय...

अहमदाबाद : पंजाब आणि कोलकाता यांच्यामध्ये आजचा सामना रंगणार आहे. आजचा सामना जिंकून पंजाबचा संघ मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत पिछाडीवर टाकू शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ विजयी ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. कोलकाताच्या संघाने नाणेफेक जिंकली, पाहा काय घेतला निर्णय...कोलकाताच्या संघाने यावेळी नाणेफेक जिंकली असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंजाबचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. पंजाबच्या मोहम्मद शमीवर असेल सर्वांचीच नजर...


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sWOhnk

IPL 2021 : करोनामुळे खेळाडू आयपीएल सोडून चालल्यावर बीसीसीआयच्या अध्यक्ष सौरव गांगुलींचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

मुंबई : भारतामध्ये करोनाचे तांडव सुरु आहे. दिवसागणिक करोना रुग्णांची वाढ होते आहे. त्यामुळेच काही खेळाडू आता आयपीएलमधून बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी काही खेळाडूंनी आयपीएल खेळण्यास नकार दिला आहे. भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने आता आयपीएलमधून माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू अँड्र्यू टाय, अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी देखील स्पर्धेतून माघार घेतली आहे. या सर्व गोष्टींनंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आता एक मोठे वक्तव्य केले आहे. खेळाडू एकिकडे आयपीएल सोडून जाताना पाहायला मिळत आहेत. पण या गोष्टीचा कोणताही परिणाम बीसीसीआयवर होताना दिसत नाही. कारण बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी नियोजित वेळापत्रकानुसारच आयपीएल होणार असल्याचे सांगितले आहे. गांगुली यांनी याबाबतीच माहिती सोमवारी 'स्पोर्ट्सस्टार'ला दिली. आर. अश्विनने आयपीएल सोडण्याचा निर्णय का घेतला, पाहा... अश्विनच्या कुटुंबियांना करोनाची बाधा झाली आहे. याबाबत अश्विन म्हणाला की, " उद्यापासून मी आयपीएलच्या या हंगामातून ब्रेक घेत आहे. माझे कुटुंबीय करोनाशी लढत आहेत. अशा कठीण काळात मी त्यांच्या सोबत राहणार आहे. जर परिस्थिती ठिक झाली तर मला पुन्हा आयपीएलमध्ये परत येण्याची आशा आहे." आयपीएल सोडू जाण्याचे कारण काय आहे, पाहा...ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अँड्र्यू टायने भारतात कोरनाचे रुग्ण वाढत चालल्याने ऑस्ट्रेलियात प्रवेश बंदी होण्याची शक्यता असल्याने आयपीएल मधूनच सोडण्याचा निर्णय घेतला. सोमवारी दोहा येथून सेन रोडिओशी बोलताना टायने सांगितले की, "ऑस्ट्रेलियाचे अनेक क्रिकेटपटू अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकता. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळणारे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू एडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी देखील स्पर्धेतून माघार घेतली आहे, याची अनेक कारणे आहेत. मुख्य कारण म्हणजे भारतातून पर्थमध्ये येणाऱ्या लोकांच्या क्वांरटाइनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. पर्थ सरकारने पश्चिम ऑस्ट्रेलियात प्रवेश करणाऱ्यांची संख्या कमी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. बायो बबलमध्ये राहिल्याने खुप थकलो आहे हे देखील एक कारण आहे. त्याच बरोबर असा विचार केला की ऑस्ट्रेलियात प्रवेश बंदी होण्याआधी घरी पोहचू. ऑगस्ट महिन्यापासून मी फक्त ११ दिवस बायो बबलच्या बाहेर राहिलो आहे. आता घरी जाण्याची इच्छा आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vlSym0

IPL 2021 : ऑस्ट्रेलियाचा खेळाडू भारतातील करोनाच्या लढ्यात उतरला, भारतीय खेळाडूंना कधी जाग येणार...

मुंबई : भारतातील करोनाच्या लढ्यासाठी आता ऑस्ट्रेलियाचा खेळाडू उतरला आहे. पण भारतीय खेळाडू मात्र आयपीएल खेळण्यात मग्न आहेत. त्यामुळे आता भारताच्या खेळाडूंना कधी जाग येणार, असा सवाल आता चाहते विचारत आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सोशल मीडियावर एक पत्र जाहीर केले आहे. यामध्ये कमिन्सने सांगितले आहे की, " सध्याच्या घडीला भारतामध्ये फार कठिण काळ सुरु आहे. भारतामध्ये सध्याच्या घडीला ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन टँक विकत घेण्यासाठी मी ५० हजार डॉलरएवढी रक्कम देत आहे." केकेआरने कमिन्सला २०१९ साली १५.५० कोटी रुपयांची चबोली लावून संघात स्थान दिले होते. २०१९ च्या आयपीएलच्या लिलावात कमिन्स हा सर्वात महगडा खेळाडू ठरला होता. पण हे पैसे आता कमिन्सने सत्कारणी लावण्याचे ठरवले आहे. कारण आता जवळपास ३७ लाख रुपये त्याने भारतामध्ये ऑक्सिजन मिळाला, यासाठी दान केले आहेत. त्यामुळे आता भारताचे क्रिकेटपटू तरी या लढाईत पुढे येऊन मदत करणार का, याकडे सर्वांचेच लक्ष असेल. कारण जर बाहेरचा एक खेळाडू आपल्या देशात येऊन मदत करू शकतो. जवळपास ५० हजार डॉलर्सची तो मदत करू शकतो, तर भारताचे खेळाडू ही गोष्ट का करू शकत नाहीत, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. कमिन्स हा फक्त आयपीएल खेळताना दिसत नाही, तर तो ज्या देशामध्ये आपण खेळत आहोत तिथेही मदत करताना पाहायला मिळत आहे. पण भारताच्या खेळाडूंनी मात्र एवढी मोठी मदत केल्याचे पाहायला मिळत नाही. भारताचे आजी-माजी खेळाडू हे सध्याच्या घडीला आयपीएल खेळताना दिसत आहेत. पण ते करोनाच्या लढ्याला मात्र मदत करताना दिसत नाहीत. त्यामुळेच भारताच्या चाहत्यांना आता या क्रिकेटपटूंना जाब विचारायला सुरुवात केली आहे. कारण करोनाचे देशात तांडव सुरु असले तरी आयपीएल मात्र सुरु आहे. त्याचबरोबर या खेळाडूंकडून कोणतीही मदत भारताच्या करोनाच्या लढाईला मिळाल्याचे पाहायला मिळत नाही. त्यामुळे आता कमिन्सच्या मदतीनंतर भारतीय खेळाडू तरी पुढे सरसारवणार का, याकडे चाहत्यांचे नक्कीच लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Pof4Lz

विराटसाठी ब्लॅक संडे; चेन्नई विरुद्ध पराभवानंतर झाली कारवाई

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार यासाठी काल रविवारी सर्वात वाइट ठरला. आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत विजय ठरलेल्या विराटच्या आरसीबीला काल प्रथमच पराभव पाहावा लागला. वाचा- चेन्नई विरुद्धच्या सामन्यात विराटने प्रथमच टॉस गमावला. त्यानंतर चांगल्या सुरुवातीनंतर चेन्नईने १९ षटकापर्यंत १५४ धावा केल्या होत्या. त्यांनी अखेरच्या षटकात ३७ धावा करून धावसंख्या १९१ पर्यंत पोहोचवली. आरसीबीने डावाची सुरूवात धडाकेबाज केली. पण त्यानंतर त्यांचा डाव कोसळला. स्वत: विराटला धावा करता आल्या नाही. २० षटकात आरसीबीने फक्त १२२ धावा केल्या. वाचा- सलग चार विजय मिळवणाऱ्या विराटला या हंगामात प्रथमच पराभवाचा धक्का बसला. या पराभवानंतर विराट कोहलीवर कारवाई झाली. आरसीबीच्या गोलंदाजांनी धीम्या गतीने षटके टाकल्याने कर्णधार विराट कोहलीला १२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला. वाचा- चेन्नई विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने धीम्या गतीने गोलंदाजी केली, यासाठी हा दंड करण्यात आल्याचे आयपीएलने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. वाचा- धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल या हंगामात कारवाई झालेला विराट हा चौथा कर्णधार आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी, कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार इयान मॉर्गन आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर ही कारवाई झाली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eAmLqq

IPL 2021 : गूड न्यूज... भारताला करोनाच्या लढाईसाठी ऑस्ट्रेलियाचा हा क्रिकेटपटू ऑक्सिजनची मदत करणार

मुंबई : भारतामध्ये सध्याच्या घडीला करोनाचे तांडव पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भारतामध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्याचे पाहायला मिळत आहे. करोनाच्या या लढ्यात आता ऑस्ट्रेलियाचा एक क्रिकेटपटू भारताची मदत करण्यासाठी उतरला आहे. कोणत्याही भारताच्या क्रिकेटपटूला जे जमले नाही ते आता या परदेशी क्रिकेटपटूने करून दाखवले आहे. भारतामध्ये ऑक्सिजनची मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या या क्रिकेटपटूने आता चक्क ५० हजार डॉलर्सची मदत देण्याचे ठरवले आहे. भारतामध्ये सध्याच्या घडीला प्रत्येक दिवशी जवळपास दोन लाख करोनाचे रुग्ण आढळत आहे. यामधील सर्वात जास्त मृत्यू हे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे होत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा भारतामध्ये सुरळीत व्हावा, यासाठी आता हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पुढे सरसावला आहे. सोमवारी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सोशल मीडियावर एक पत्र जाहीर केले आहे. यामध्ये कमिन्सने सांगितले आहे की, " सध्याच्या घडीला भारतामध्ये फार कठिण काळ सुरु आहे. भारतामध्ये सध्याच्या घडीला ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन टँक विकत घेण्यासाठी मी ५० हजार डॉलरएवढी रक्कम देत आहे." कमिन्स हा सध्याच्या घडीला आयपीएल खेळत असून तो कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात आहे. केकेआरने कमिन्सला २०१९ साली १५.५० कोटी रुपयांची चबोली लावून संघात स्थान दिले होते. २०१९ च्या आयपीएलच्या लिलावात कमिन्स हा सर्वात महगडा खेळाडू ठरला होता. पण हे पैसे आता कमिन्सने सत्कारणी लावण्याचे ठरवले आहे. कारण आता जवळपास ३७ लाख रुपये त्याने भारतामध्ये ऑक्सिजन मिळाला, यासाठी दान केले आहेत. त्यामुळे आता भारताचे क्रिकेटपटू तरी या लढाईत पुढे येऊन मदत करणार का, याकडे सर्वांचेच लक्ष असेल. कारण जर बाहेरचा एक खेळाडू आपल्या देशात येऊन मदत करू शकतो. जवळपास ५० हजार डॉलर्सची तो मदत करू शकतो, तर भारताचे खेळाडू ही गोष्ट का करू शकत नाहीत, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता कमिन्सने मदत केल्यावर भारताचे कोणते क्रिकेटपटू पुढे येऊन समाजासाठी दान करणार आहेत, याकडू सर्वांचे लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aIvJ3Q

IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरच्या एका मोठ्या चुकीमुळेच झाला हैदराबादचा पराभव, जाणून घ्या...

मुंबई : सनरायझर्स हैदराबादला सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. यावेळी हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरकडून एक चुक घडल्याचे पाहायला मिळाले. या एका चुकीमुळे हैदराबादला पराभवचा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. सुपर ओव्हरमध्ये वॉर्नर हा फलंदाजी करायला आला होता. अक्षर पटेल दिल्लीकडून सुपर ओव्हरचे षटक टाकत होता. या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर वॉर्नरने दोन धावा घेतल्या. त्यामुळे सुरुवातीला दिल्लीपुढे ९ धावांचे आव्हान असल्याचे सांगण्यात आले. पण काही वेळाने तिसऱ्या पंचांनी वॉर्नरची एक मोठी चुक यावेळी दाखवून दिली आणि दिल्लीचे आव्हान आठ धावांचे ठेवण्यात आले. वॉर्नर जेव्हा दोन धावा घेण्यासाठी पळाला. तेव्हा पहिला धाव काढता त्याला पूर्ण धाव घेता आली नाही. कारण यावेळी क्रिझच्या आतमध्ये बॅट न आणता तो दुसरी धाव घेण्यासाठी धावला आणि हीच चुक हैदराबादच्या संघाला चांगली भोवली. या एका चुकीमुळे हैदराबादची एक धाव कमी झाली. दिल्लीला सुपर ओव्हरमध्ये अखेरच्या चेंडूवर फक्त एक धाव विजयासाठी हवी होती. तो चेंडू मिस झाला आणि पण दिल्लीला एक धाव घेता आली. त्यावेळी जर दिल्लीला दोन धावा हवा असल्या असत्या आणि त्यांनी जर एकच धाव घेतली असती तर हा सामना पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये गेला असता. त्यामुळे दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पुन्हा एकदा हैदराबादच्या विजयाची शक्यता वाढू शकली असती. नियम काय सांगतो, ते पाहा...शॉर्ट रनचा नियम असा सांगतो की, कोणता फलंदाज धाव घेत आसताना त्याने आपली बॅट क्रिझमध्ये आणणे गरजेचे आहे. पण यावेळी वॉर्नरने क्रीझमध्ये बॅट आणली नाही. त्याने फक्त त्या रेषेवर बॅट आणली आणि तो धाव घेण्यासाठी धावला. त्यामुळेच पंचांनी एक धाव शॉर्ट असल्याचा निर्णय घेतला. पण ही एक धाव हैदराबादला पराभव देऊन गेली. त्यामुळे कर्णधार वॉर्नरची ही चुक संघाला चांगलीच भोवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे यापुढे खेळताना वॉर्नरला नक्कीच या गोष्टीवर लक्ष द्यावे लागणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gGoIo6

देशातील परिस्थीतीवर तुम्ही बहिरे किंवा अंध होऊ शकत नाही, IPL आयोजनावर अभिनव बिंद्राची सडकून टीका

नवी दिल्ली : भारतात रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. करोनाच्या या दुसऱ्या लाटेत आता दिवसाला ३ लाखहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. गेल्या काही महिन्यात नियंत्रणात आलेला करोना आता मार्च-एप्रिलमध्ये पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. देशातील अनेक राज्य सरकारांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. राजधानी दिल्लीत ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आलाय. वाचा- एका बाजूला देशात करोना रुग्ण वाढत असताना दुसरीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळने आयपीएलच्या १४व्या हंगामाचे आयोजन केले आहे. देशातील सहा राज्यात बायो बबलमध्ये ही स्पर्धा होत असून आतापर्यंत २० लढती झाल्या आहेत. याची अंतिम लढत ३० मे रोजी होणार आहे. देशात करोना रुग्ण वाढत असताना आयपीएलच्या आयोजनावर जोरदार टीका होत आहे. वाचा- भारताला ऑलिपिंकमध्ये सुवर्णपदक जिंकून देणारा नेमबाज याने देखील आयपीएलच्या आयोजनावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहलेल्या लेखात अभिनव म्हणतो, क्रिकेटपटू आणि अधिकारी बाहेर जे काही सुरू आहे त्याबद्दल बहिरे किंवा अंध होऊ शकत नाहीत. देशात करोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असताना आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. वाचा- आयपीएल खेळणारे क्रिकेटपटू आणि स्पर्धेतील अधिकारी त्यांचे आयुष्य बायो बबलमध्ये जगू शकत नाहीत. देशात जे काही घडत आहे. त्याबद्दल ते स्वत:ला वेगळे ठेवू शकत नाहीत. वाचा- मी फक्त याची कल्पना करू शकतो की आयपीएल सुरू आहे आणि स्टेडियमच्या बाहेरील रस्त्यावरून रग्णवाहिका जात आहे. मला वाटते की सेलिब्रेशन थोड कमी झाले पाहिजे. कारण समाजाप्रती तुम्ही थोडा सन्मान दाखवला पाहिजे, असे अभिनवने लिहले आहे. वाचा- राजधानी दिल्लीत २८ एप्रिलपासून आयपीएलच्या साखळी फेरीतील लढती अरुण जेटली स्टेडिमयवर होणार आहेत. दिल्ली होणाऱ्या लढतीबद्दल आतापर्यंत सरकारकडून याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. स्पर्धेतील साखळी फेरीतील लढती २३ मे रोजी संपणार आहेत. त्यानंतर २५ ते ३० मे या काळात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्ले ऑफ आणि अंतिम सामने होतील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QvZJsZ

मोठी बातमी; अनेक खेळाडू IPL मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर

मुंबई : आयपीएलच्या १४व्या हंगामात खेळणाऱ्या चार खेळाडूंनी करोना व्हायरसमुळे स्पर्धा मधूनच सोडण्याचा निर्णय घेतलाय. यात एक भारतीय आणि तीन परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू एड्यू टायने यासंदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे. वाचा- टायने भारतात कोरनाचे रुग्ण वाढत चालल्याने ऑस्ट्रेलियात प्रवेश बंदी होण्याची शक्यता असल्याने मधूनच सोडण्याचा निर्णय घेतला. सोमवारी दोहा येथून सेन रोडिओशी बोलताना टायने सांगितले की, ऑस्ट्रेलियाचे अनेक क्रिकेटपटू अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकता. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळणारे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू एडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी देखील स्पर्धेतून माघार घेतली आहे. वाचा- याची अनेक कारणे आहेत. मुख्य कारण म्हणजे भारतातून पर्थमध्ये येणाऱ्या लोकांच्या क्वांरटाइनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. पर्थ सरकारने पश्चिम ऑस्ट्रेलियात प्रवेश करणाऱ्यांची संख्या कमी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत, असे टाय म्हणाला. बायो बबलमध्ये राहिल्याने खुप थकलो आहे हे देखील एक कारण आहे. त्याच बरोबर असा विचार केला की ऑस्ट्रेलियात प्रवेश बंदी होण्याआधी घरी पोहचू. ऑगस्ट महिन्यापासून मी फक्त ११ दिवस बायो बबलच्या बाहेर राहिलो आहे. आता घरी जाण्याची इच्छा आहे. वाचा- इंग्लंड आणि न्यूझीलंडसह अनेक देशांनी भारतातून प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाने ३० टक्के वाहतूक कपात केली आहे आणि त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून रोज ३ लाख रुग्ण सापडत आहेत. माझ्या परत येण्याच्या निर्णयानंतर अनेकांनी फोन केले. ते विचारत आहेत की मी कोणत्या मार्गाने जात आहे. जी आकडेवारी समोर येत आहे ती अधिकृत आहे. पण त्यापेक्षा संख्या जास्त असू शकते, असे तो म्हणाला. वाचा- आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ,पॅट कमिन्स, मार्कस स्टायोनिस आदी खेळाडू आहेत. यातील अनेक जण मायदेशात परतण्याचा विचार करत आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32UVDNr

IPL 2021: पंजाब किंग्जला मुंबई इंडियन्सला मागे टाकण्याची संधी, आज KKR विरुद्ध लढत

अहमदाबाद : मध्ये आज (सोमवार) साखळी फेरीतील २१वी लढत आणि यांच्यात होणार आहे. ही लढत अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून या हंगामात या मैदानावर होणारी ही पहिलीच लढत आहे. वाचा- पंजाब किंग्ज संघाने गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स सारख्या तगड्या संघाचा पराभव केला होता. त्यांचा या हंगामात पहिल्या लढतीत विजय मिळवल्यानंतर सलग तीन सामन्यात पराभव झाला होता. आता मुंबई विरुद्धच्या विजयाने त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. या उलट कोलकाता नाइट रायडर्सचा गेल्या चार लढतीत पराभव झालाय. कोलकाता कोणत्याही परिस्थितीत या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. वाचा- इंग्लंडला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या इयान मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सला या हंगामात आतापर्यंत चांगली कामगिरी करता आली नाही. स्वत: कर्णधार मॉर्गन फॉर्ममध्ये नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या लढतीत त्यांचा सहा विकेटनी पराभव झाला होता. आज पंजाबविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्यांना ही पराभवाची मालिका तोडावी लागले. वाचा- कोलकाताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले आहेत. नितीश राणाने दोन अर्धशतक केली आहेत आणि दिनेश कार्तिकने दोन सामन्यात चांगल्या धावा केल्या. पण अन्य खेळाडूंची कामगिरी निराश झाली आहे. सलामीवीर शुभमन गिल देखील धावा करू शकला नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dNwo6a

धोनीमुळे अखेरच्या षटकात ३७ धावा करू शकलो; विक्रमानंतर रविंद्र जडेजाने केला खुलासा

मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा विजय रथ रोखला. चेन्नईच्या ऑलराउंडर रविंद्र जडेजासमोर विराट कोहलीचा बेंगळुरू संघ हतबल दिसला. जडेजाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण मध्ये योगदान दिले. वाचा- ... मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात जडेजाने २८ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६२ धावा केल्या. त्याने २०व्या षटकात हर्षल पटेलला ३७ धावा काढून संघाला १५४ धावसंख्येवरून १९१ पर्यंत मजल मारून दिली. या स्फोटक खेळीबद्दल बोलताना जडेजा म्हणाला, जेव्ही तुम्ही खेळाचा आनंद घेता तेव्हा संघाच्या विजयात योगदान देता. मी फिटनेस आणि कौशल्यावर खुप मेहनत घेत आहे. माझी मेहनत कामी आली. कारण फलंदाजी आणि गोलंदाजीत मी चांगले योगदान दिले. वाचा- एक ऑलराउंडर म्हणून खेळणे खुप अवघड असते. तुम्हाला सर्व विभागात चांगली कामगिरी करावी लागते. सराव दरम्यान मी फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग या सर्व गोष्टी करत नाही. एक दिवस एका स्किलवर काम करतो. तर दुसऱ्या दिवशी फिटनेसवर काम करतो. अशा पद्धतीने मी वर्कलोड मॅनेज करतो, असे तो म्हणाला. अखेरच्या षटकात धोनीमुळे झाल्या ३७ धावा बेंगळुरू विरुद्धच्या अखेरच्या षटकात मी मोठे फटके खेळण्याचा विचार करत होतो आणि धोनीने मला सांगितले की हर्षल पटेल कशा पद्धतीची गोलंदाजी करू शकतो. धोनीने मला सांगितले की, हर्षल ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकणार आणि त्यासाठी मी तयार होते. सुदैवाने मी चेंडू चांगला कनेक्ट केला आणि आम्ही १९१ पर्यंत पोहोचलो. आमच्या संघासाठी ती खुप चांगली ओव्हर होती. मी स्ट्राइकवर राहिलो तर धावा करू शकतो. मी गोलंदाजीत योगदान दिले आणि एक धावबाद देखील केले. या गोष्टीचा मला आनंद आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32QoLFE

भारतात करोना वाढतोय; ३ खेळाडूंनी IPL सोडले, या दोन संघांना बसणार फटका

मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातून आणखी ३ खेळाडूंनी माघार घेतली आहे. स्पर्धा सुरू असताना देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे कारण देत या खेळाडूंनी मायदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२१मध्ये आतापर्यंत २० लढती झाल्या आहेत. याआधी काही खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतील होती. वाचा- क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघातील फिरकीपटू , आणि यांनी देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयपीएल २०२१ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. रविवारी रात्री दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू आर अश्विनने करोनामुळे स्पर्धेतून माघार घेतली. अश्विनच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाली आहे आणि त्यांच्यासाठी अश्विनने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. वाचा- ज्या तीन ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी एडम झम्पा आणि केन रिचर्डसन हे विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळतात. तर एड्यू टाय हा राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. झम्पाने आरसीबीकडून एकही मॅच खेळली नव्हती तर रिचर्डसनने फक्त एक मॅच खेळली होती. टायला या हंगामात राजस्थान संघाने एकही संधी दिली नव्हती. आयपीएलचा १४वा हंगाम ९ एप्रिलपासून सुरू झाला. त्याआधी अनेक खेळाडूंनी कोरना आणि अन्य कारणांमुळे माघार घेतली होती. यात जोश हेजलवूडचा देखील समावेश होता. तर काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन याने बाबो बबलमुळे थकवा आल्याचे कारण देत माघार घेतली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3np7RaS

Sunday, April 25, 2021

Breaking News: कुटुंबीयांना करोनाची लागण, या खेळाडूचा IPL सोडण्याचा निर्णय; पाहा काय म्हणाला...

चेन्नई: देशात करोनाचे मृत्यू तांडव सुरू आहे. अशाच आयपीएलचा १४वा हंगाम सुरू आहे. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या रवीचंद्रन अश्विन याने मधून नाव माघारी घेतले आहे. करोनामुळे स्पर्धेच्या मधूनच नाव मागे घेणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. वाचा- दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने प्रथम मुंबईत काही लढती खेळल्या होत्या. त्यानंतर ते चेन्नईत दाखल झाले. काल रविवारी दिल्लीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना खेळला. यात अश्विन देखील खेळला होता. सामना झाल्यानंतर अश्विनने सोशल मीडियावर ही माहिती दिली. या कठिण काळात मी कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. वाचा- ... उद्यापासून मी आयपीएलच्या या हंगामातून ब्रेक घेत आहे. माझे कुटुंबीय करोनाशी लढत आहेत. अशा कठीण काळात मी त्यांच्या सोबत राहणार आहे. जर परिस्थिती ठिक झाली तर मला पुन्हा आयपीएलमध्ये परत येण्याची आशा आहे. अश्विनच्या या ट्विटला दिल्ली कॅपिटल्सने उत्तर दिले आहे. या अवघड काळात आम्ही तुला पूर्ण पाठिंबा देतो. तुझ्यासाठी आणि कुटुंबासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या प्रार्थना नेहमी असतील. वाचा- संपूर्ण जगात पुन्हा एकदा करोनाची लाट आली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. कोरनाच्या या दुसऱ्या लाटेत देशात रोज ३ लाखाहून अधिक रुग्ण सापडत आहेत. काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडीलांना करोनाची लागण झाली होती. धोनीने तेव्हा संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. आता अश्विनच्या कुटुंबातील सदस्यांना करोनाची लागण झाली आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोनाची लागण झाली होती. राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज टायने रविवारी वैयक्तीक कारणामुळे मायदेशात जाण्याचा निर्णय घेतला. आयपीएल २०२१ मधून बाहेर पडणारा तो चौथा परदेशी खेळाडू ठरला. याआधी इंग्लंडचा जोफ्रा आर्चर (दुखापत), बेन स्टोक्स (दुखापत), लियाम लिव्हिगस्टोन (बाबो-बबलमुळे थकवा) हे आयपीएलमधून बाहेर पडले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Qwv7Yj

IPL 2021 : सुपर ओव्हरमधील विजयासह दिल्लीने गुणतालिकेत दिला आरसीबीला धक्का, पाहा कोणते स्थान पटकावले....

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये विजय साकारला. या विजयासह दिल्लीच्या संघाने गुणतालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाला धक्का दिल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ हा तिसऱ्या स्थानावर होता. दिल्लीच्या संघाने या सामन्यापूर्वी चार सामने खेळले होते, त्यामध्ये त्यांनी तीन विजय मिळवले होते. त्यामुळे सहा गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर होते. पण आजच्या सामन्यात त्यांनी हैदराबादवर विजय मिळवला आणि गुणतालिकेत आरसीबीला धक्का देत दुसरे स्थान पटकावले आहे. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला अव्वल स्थानावर असलेल्या आरसीबीला आता तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. दिल्लीच्या १६० धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली असली तरी त्यांना मोठी सलामी मिळाली नाही. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यावेळी सहा धावांवर धावचीत झाला आणि त्यांना पहिला धक्का बसला. त्यानंतर जॉनी बेअरस्टोने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि जोरदार फटकेबाजी केली. पण मोठा फटका मारण्याच्या नादात जॉनी बाद झाला. जॉनीने यावेळी १८ चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ३८ धावांची खेळी साकारली. जॉनी बाद झाल्यावर संघाची जबाबदारी ही केन विल्यम्सनवर आली होती. कारण जॉनीनंतर विराट सिंग आणि केदार जाधव लवकर बाद झाले. पण त्यानंतर केनने आपले अर्धशतक साकारले. दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीच्या सलामीवीरांनी यावेळी चांगली सुरुवात करत हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. पृथ्वी शॉ यावेळी आक्रमक फटकेबाजी करत होता. पृथ्वी आणि शिखर धवन यांनी यावेळी ८१ धावांची दमदार सलामी दिली. पण त्यानंतर हैदराबादचा फिरकीपटू रशिद खानने धवनला त्रिफळाचीत केले आणि दिल्लीला पहिला धक्का दिला. धवनला यावेळी २८ धावा करता आल्या. पृथ्वीने यावेळी अर्धशतकही साकारले. पण धवन बाद झाल्यावर पृथ्वी जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. यावेळी पृथ्वी आणि कर्णधार रिषभ पंत यांच्यामध्ये योग्य समन्वय पाहायला मिळाला नाही. त्यामुळेच पृथ्वी यावेळी धावचीत झाला. पृथ्वीने यावेळी ३९ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. पृथ्वी बाद झाल्यावर काही काळ रिषभ आणि स्टीव्हन स्मिथ यांची चांगली भागीदारी पाहायला मिळाली. पंत २७ चेंडूंत ३७ धावा काढून बाद झाला. पण त्यानंतर स्मिथने फलंदाजी करत संघाला १५९ धावांपर्यंत पोहोचवले. स्मिथने यावेळी २५ चेंडूंत नाबाद ३४ धावांची खेळी साकारली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nvSDkt

SRH vs DC Live Score : दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली, रिषभ पंतने काय निर्णय घेतला पाहा...

चेन्नई, : हैदराबाद आणि दिल्ली यांच्यामध्ये आज महत्वाची लढत पाहायला मिळणार आहे. या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. पाहा लाइव्ह स्कोअर बोर्ड- सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा हैदराबादवर दिमाखदार विजय सुपर ओव्हरमध्ये हैदराबादचे दिल्लीपुढे ८ धावांचे आव्हान हैदराबाद आणि दिल्लीचा सामना अखेर सुपर ओव्हरमध्ये रंगणार... हैदराबादला सातवा धक्का, विजय शंकर आऊट रशिद खान आऊट, हैदराबादला सहावा धक्का अभिषेक शर्मा आऊट, हैदराबादला पाचवा धक्का हैदराबादच्या केन विल्यम्सनचे अर्धशतक केदार जाधव आऊट, हैदराबादला चौथा धक्का हैदराबादला तिसरा धक्का, विराट सिंग आऊट जॉनी बेअरस्टो आऊट, हैदराबादला दुसरा धक्का हैदराबादला मोठा धक्का, डेव्हिड वॉर्नर आऊट दिल्लीचे हैदराबादपुढे विजयासाठी १६० धावांचे आव्हान कर्णधार रिषभ पंत आऊट, दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, अर्धशतकवीर पृथ्वी शॉ आऊट पृथ्वी शॉचे दमदार अर्धशतक शिखर धवन आऊट, दिल्लीला पहिला धक्का दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने सामन्यापूर्वी कोणता संदेश दिला, पाहा...


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tSUl1o

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...