ब्लॉमफोन्टेन: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये वनडे मालिका सुरू आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत यजमान आफ्रिकेने मालिका जिंकली. दुसऱ्या वनडे सामन्यात एक अजब प्रकार घडला. सामना झाल्यानंतर एक नव्हे तर चक्क दोन खेळाडूंना सामनावीर पुरस्कार द्यावा लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे फार कमी प्रसंग आले आहेत जेव्हा एक नव्हे तर दोन खेळाडूंना सामनावीर पुरस्कार द्यावा लागला. त्याच बरोबर एकाच संघातील दोन खेळाडूंना सामनावीर म्हणून गौरवण्याची घटना फक्त दोन वेळा झाली आहे. वाचा- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडेत दोन खेळाडूंनी त्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर सामनावीर पुरस्कार मिळवला. वाचा- दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेच्या लुंगी नगिदीच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा २७१ धावांवर ऑल आऊट झाला. लुंगीने ६ विकेट घेतल्या. त्यानंतर आफ्रिकेचा ओपनर जानेमन मलान याने शतकी खेळी केली. आफ्रिकेला पहिला धक्का एक धाव संख्येवर बसला. पण त्यानंतर मलानने १३९ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह १२९ धावा केल्या. लुंगी आणि मलान दोघांनी शानदार कामगिरी केल्यामुळे सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TmgEwK
No comments:
Post a Comment