नवी दिल्ली : आगामी आयपीएल मोसमात आणखी एका नव्या संघाची एंट्री होऊ शकते. आयपीएलमध्ये एकूण दोन नव्या संघांच्या समावेशाची चर्चा असली तरी बीसीसीआय केवळ एकाच संघासाठी अनुकूल आहे. कारण, एकाच वेळी ९० पेक्षा जास्त सामन्याचं आयोजन करण्यासाठी पुरेशा विंडो उपलब्ध नाहीत. २०२२ पर्यंत ९ संघांसोबतच आयपीएल मालिका होऊ शकते. त्यानंतर आयसीसीच्या भविष्य दौरा कार्यक्रमावर आधारित निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. आयसीसीच्या भविष्य दौरा कार्यक्रमामुळे बीसीसीआयला फक्त ९ संघांची परवानगी मिळू शकते, ज्यात एकूण ७६ सामने खेळले जातील. यासाठी सध्याची विंडो वाढवली जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘जोपर्यंत २०२३ मध्ये नवीन भविष्य दौरा कार्यक्रम येत नाही, तोपर्यंत आयपीएलमध्ये फक्त ९ संघच चांगल्या पद्धतीने खेळू शकतात.’ दुसरं मोठं कारण म्हणजे बीसीसीआय नव्या फ्रँचायझीसाठी ३०० मिलियन डॉलर म्हणजे जवळपास २००० कोटी रुपयांच्या बेस प्राइसबाबत विचार करत आहे. एकाच ठिकाणाहून या प्रकारची गुंतवणूक येईल का याबाबतचं चित्र अद्याप अस्पष्ट आहे. सूत्रांच्या मते, ‘गुंतवणूकदार आहेतच, तो मुद्दा नाही. पण टेबलवर आवश्यक खरेदीदार येतील का, जिथे बोली लावणं प्रतिस्पर्धी प्रक्रिया होईल. यावरच ठरवलं जाईल.’ आयपीएलमध्ये गुजरातचा संघ? ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, तिसरं कारण म्हणजे अहमदाबादच्या मोटेरा स्टेडिअममध्ये सरदार पटेल स्टेडिअम तयार होत आहे. हे मैदान सामन्यांसाठी मार्च २०२० पर्यंत उपलब्ध होऊ शकतं. १.१ लाख प्रेक्षक बसण्याची क्षमता असलेलं हे जगातलं सर्वात मोठं स्टेडिअम असणार आहे. त्यामुळे या मैदानाची स्वतःची फ्रँचायझी नसण्याला अर्थ उरत नाही. जाणकारांच्या मते, ‘अहमदाबादमध्ये क्रिकेटसाठी आणि उपलब्ध संसाधने लक्षात घेता नवीन फ्रँचायझी येऊ शकते. त्यामुळे फ्रँचायझीसाठी नवीन टेंडर आलं तर स्वाभाविकपणे अनेक जण याच्या बाजूने असतील आणि भविष्यात यामुळे काही मानके निश्चित होतील.’ बीसीसीआयसमोर इतरही प्रश्न बीसीसीआयकडे १० व्या फ्रँचायझींचा समावेश करण्यापूर्वी इतरही अनेक मुद्दे आहेत. कोची टस्कर्सचाही बीसीसीआयसमोर प्रश्न आहे, ज्याला १५०० कोटी रुपये देणं (मध्यस्थाद्वारे) आहे. आयपीएलमधून बाहेर झालेल्या डेक्कन चार्जर्ससोबत आयसीआयसीआयच्या नेतृत्त्वात मध्यस्थता अंतिम टप्प्यात आहे. आणखी एक मध्यस्थता पुण्याच्या सहारा वॉरियर्ससोबतही आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘कोची टस्कर्सला पैसे किंवा मताधिकाराचा पर्याय दिला जाईल का हा प्रश्न आहे. भलेही बीसीसीआय काही बाबतीत बॅकफूटवर आहे आणि काही बाबतीत मजबूत आहे, पण तरीही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि त्याला योग्य पद्धतीने हाताळणंच योग्य आहे.’ यावर १ डिसेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. यावर्षी खेळलेले ८ संघ आतापर्यंत आयपीएलच्या १२ एडिशन खेळल्या गेल्या आहेत. ज्यात चॅम्पियन मुंबई इंडियन्ससह चेन्नई सुपरकिंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांचा समावेश आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2qnXDOZ
No comments:
Post a Comment