Ads

Friday, November 22, 2019

भारतीय संघ १२ वर्षांनी पुन्हा 'त्याच' इतिहासाची पुनरावृत्ती करणार?

कोलकाता : ऐतिहासिक डे-नाईट कसोटीत बांगलादेशची चांगलीच दैना झाली आहे. कोलकात्यातील ईडन गार्डन्समध्ये कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना पिंक बॉलने खेळवला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फलंदाजांनी चुकीचा ठरवला. कारण, बांगलादेशचा संघ केवळ १०६ धावातच गारद झाला. भारताकडून इशांत शर्माने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याखालोखाल उमेश यादव ३ आणि मोहम्मद शमीनेही २ फलंदाजांना माघारी पाठवलं. या कसोटीत भारत पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची शक्यता आहे. २००७ ला मिरपूर कसोटीत भारताने बांगलादेशचा डाव ११८ धावात गुंडाळला होता. त्यापेक्षाही कमी धावात यावेळी बांगलादेशला गारद करण्यात आलं. पण यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तेव्हा भारताने ३ बाद ६१० धावा केल्या होत्या. २००७ च्या कसोटीत भारताचे दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिक, वसिम जाफर, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी शतकी खेळी केली होती. २००७ ची कसोटी आणि पिंक बॉल कसोटीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळीही वेगवान गोलंदाज झहीर खानने ५ विकेट्स घेतल्या होत्या. यावेळीही वेगवान गोलंदाजानेच ५ विकेट्स घेतल्या आणि निम्मा संघ एकट्या इशांत शर्मानेच माघारी धाडला. फोलोऑनची नामुष्की ओढावलेल्या बांगलादेशचा दुसरा डावही २५३ धावात आटोपला आणि भारताने २३९ धावांनी विजय मिळवला होता. ईडन गार्डन्स आणि विक्रम दिग्गजांच्या उपस्थितीत ऐतिहासिक कसोटीची सुरुवात झाली. ईडन गार्डन्सचं मैदान आणि भारतीय संघाचा विक्रम हे जुनं समीकरण आहे. २००१ ला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीत भारताचा पहिला डाव १७१ धावात आटोपला आणि फोलोऑनची नामुष्की ओढावली. कारण, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या डावात भारताची ‘द वॉल’ राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी कमाल केली. राहुल द्रविडने १८० आणि लक्ष्मणने २८१ धावांची खेळी करत भारताला मजबूत स्थितीत आणलं. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात विजयासाठी भारताने ३८४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ७ विकेट्स घेणाऱ्या हरभजन सिंहने पुन्हा कमाल केली आणि दुसऱ्या डावातही ६ विकेट्स घेतल्या. सचिन तेंडुलकरनेही ३ विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २१२ धावात गुंडाळला. भारताने ही कसोटी १७१ धावांनी जिंकली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KLgKcr

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...