वृत्तसंस्था, नवी प्रदूषणामुळे दिल्लीच्या हवामानाची पातळी आणखी खाली घसरली आहे. धुक्याचे साम्राज्य असते, असे वातावरण साहजिकच परिपूर्ण नाही; पण किमान अशा हवामानामुळे कुणी दगावणार नाही हे नशीब, अशी बोचरी टीका बांगलादेशचे प्रशिक्षक रसेल डॉमिंगो यांनी केली आहे. भारताची राजधानी असलेल्या दिल्लीतील हे प्रदूषित हवामान हे बांगलादेशसाठी नवे नाही; कारण त्यांच्याकडेही हवामानाची स्तर एवढाच खालावला आहे, असेही डॉमिंगो यांनी नमूद केले. शुक्रवारी दिल्लीत आरोग्य आणीबाणी जाहीर झाली. त्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या प्रशिक्षकांनी आपले विचार मांडले. ‘लढत फक्त तीन तासांची आहे, तेव्हा प्रदूषणाची फारशी चिंता नाही. फारफार तर डोळे लाल होतील आणि घशाचे आरोग्य बिघडेल; पण तेवढे ठिक आहे,’ असेही डॉमिंगो यांनी नमूद केले. शुक्रवारी बांगलादेशचे अल अमिन, अबू हैदर रॉनी आणि फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक डॅनिएल व्हिटोरी चेहऱ्याला मास्क लावून सराव करताना बघायला मिळाले. ‘दिल्लीचे आमच्यासाठी निश्चितच धक्कादायक नाही; कारण बांगलादेश आणि इतर काही देशांतही अशीच परिस्थिती आहे. आम्हाला त्याविषयी फारशी तक्रारही नाही. मागे श्रीलंका संघाला दिल्लीत खेळताना संघर्ष करावा लागला होता; पण तेवढी अडचण आम्हाला वाटणार नाही,’ असे डॉमिंगो म्हणाले. प्रदूषण किंचीत कमी झाले, धूके जाऊन दृष्यता वाढल्यावर मात्र व्हिटोरीचा अपवाद वगळता बांगलादेशच्या इतर खेळाडूंनी मात्र मास्क काढला. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाके उडवण्यावर बंदी घातली असून, ५ नोव्हेंबरपर्यंत बांधकामांवरही निर्बंध घातले आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी गुरुवारीच स्पष्ट केले की, दिल्ली टी-२०चे ठिकाण ऐनवेळी बदलण्यात येणार नाही. मात्र, यापुढे या कालावधीत क्रिकेटचा कार्यक्रम आखताना खबरदारी घेतली जाईल. दिवाळीनंतर उत्तरेकडील मैदानावर सामने होणार नाहीत यावर भर दिला जाईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PHcmi2
No comments:
Post a Comment