कोलकाता : देशाच्या इतिहासातील पहिल्या डे नाईट कसोटीत भारताने आक्रमक सुरुवात करत पाहुण्या बांगलादेशची दैना केली आहे. पण यामध्ये क्षेत्ररक्षण करत असलेला रोहित शर्मानेही दिग्गजांचं लक्ष वेधून घेतलं. स्लीपला उभ्या असलेल्या रोहित शर्माने एका हाताने घेतलेला झेल पाहून प्रत्येक जण अवाक् झाला. रोहित शर्माच्या या अप्रतिम झेलमुळे बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकला माघारी परतावं लागलं. संकटात सापडलेल्या बांगलादेशला सावरण्यासाठी फलंदाजीसाठी समोर मोमिनुल हक उभा होता. ११ व्या षटकात विदर्भ एक्स्प्रेस उमेश यादवने पुन्हा एकदा भेदक गोलंदाजीचा प्रहार केला. चेंडू बॅटला लागला आणि स्लीपला उभ्या असलेल्या रोहित शर्माने हा चेंडू पकडण्यात कोणतीही चूक केली नाही. रोहित शर्माने एका हाताने घेतलेला झेल पाहून शेजारी खेळाडूही चक्रावले. ऐतिहासिक कसोटीत बांगलादेश संकटात ईडन गार्डन्समध्ये कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना पिंक बॉलने खेळवला जात आहे. देशात डे-नाईट कसोटीची ही पहिलीच वेळ आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फलंदाजांनी चुकीचा ठरवला. ३० व्या षटकापर्यंतच बांगलादेशचे ९ फलंदाज १०५ धावात माघारी परतले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35tJv5B
No comments:
Post a Comment