कोलकाता: कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना २२ ते २६ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयकडून जोरदार तयारी सुरू आहे. हा कसोटी सामना भारतासाठी विशेष आहे. ऐतिहासिक सामना होणार असल्यानं विशेष व्यक्तींनी या सामन्याला उपस्थित राहावं यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मास्टर ब्लास्टर यांसारख्या दिग्गजांना निमंत्रित करण्यात आल्याचं बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी सांगितलं. 'आम्ही या कसोटी सामन्याचे एका शानदार सोहळ्यात रुपांतर करणार आहोत. येत्या तीन-चार दिवसांत तुम्हाला काय होणार आहे याबाबत सर्व माहिती मिळेल,' असं गांगुली यांनी सांगितलं. भारतीय संघ पहिला दिवस-रात्र कसोटी सामना बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यात तीन टी-२० सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेनं होणार आहे. पहिला सामना दिल्लीत रविवारी होणार आहे. बांगलादेशचा संघ दिल्लीत पोहोचला आहे. या कसोटी सामन्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. तसंच पश्चिम बंगाल क्रिकेट संघाकडून २००० साली बांगलादेशसोबत पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या संघाच्या सदस्यांनाही सन्मानित करणार आहे. त्यात सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे. तसंच पश्चिम बंगाल क्रिकेट संघाकडून भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारे खेळाडू, अभिनव बिंद्रा, एम. सी. मेरी कोम, पी. व्ही. सिंधू आदींनाही सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती सौरव गांगुली यांनी दिली. दरम्यान, बांगलादेशविरुद्ध २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या 'दिवस-रात्र' कसोटी सामन्यासाठी 'बीसीसीआय'ने सहा डझन (७२) 'एसजी' गुलाबी चेंडूंची ऑर्डर दिली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही एसजी कंपनीचे चेंडू या कसोटीसाठी वापरले जातील, हे स्पष्ट केले आहे. अगदी शेवटच्या क्षणी हे स्पष्ट झाल्यामुळे 'एसजी' चेंडू उत्पादकांना वेगाने तयारी करावी लागणार आहे. आता 'एसजी'समोर कमी वेळेत आणि दर्जेदार चेंडू तयार करण्याचे आव्हान आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2N4xkWe
No comments:
Post a Comment