नवी दिल्ली: ' हा आक्रमक खेळणारा फलंदाज आहे. पण, चौथ्या स्थानावर नेमकी कशी फलंदाजी करायची असते याचा अंदाज त्याला नाही. त्यामुळं त्याला पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवायला हवं,' असं मत माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यानं व्यक्त केलं आहे. पंतची कामगिरी सध्या चिंतेचा विषय झाली आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे देखील पंतच्या कामगिरीवर नाराज आहेत. अशातच फलंदाजीतील त्याच्या क्रमाची चर्चा ऐरणीवर आली आहे. लक्ष्मणनं यावर मार्ग सुचवला आहे. 'ऋषभ हा आक्रमक प्रवृत्तीचा खेळाडू आहे. मात्र, चौथ्या क्रमांकावर तो यशस्वी होताना दिसत नाहीए. या क्रमांकावर नेमकं कोणत्या पद्धतीनं खेळायचं असतं याची जाण अद्याप त्याला नाही. त्यामुळं त्याला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर पाठवायला हवे. तिथं नैसर्गिक खेळ करून स्वत:ला सिद्ध करायची त्याला संधी मिळेल,' असं लक्ष्मणनं म्हटलं आहे. 'प्रत्येक खेळाडू बॅडपॅचमधून जात असतो. पंत खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय. मागील सामन्यांमध्ये तो स्ट्राइक बदलतानाही दिसला होता. दुर्दैवानं त्याची फटक्यांची निवड चुकते आहे. असं असलं तरी २१ वर्षांच्या या खेळाडूवर विनाकारण दबाव टाकण्याची गरज नाही,' असंही तो पुढं म्हणाला. श्रेयस किंवा पंड्या योग्य पर्याय 'चौथ्या क्रमांकावर सध्या श्रेयस अय्यर व हार्दिक पंड्या हे उत्तम पर्याय ठरू शकतात. ते अनुभवी देखील आहेत. पंतकडं सध्या महेंद्रसिंह धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जात आहे. या अपेक्षांचा एक वेगळा दबाव पंतवर आहे. त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी संघ व्यवस्थापनानं त्याच्या फलंदाजीच्या क्रमात बदल करायला हवा,' असा सल्लाही लक्ष्मण यानं दिला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VelATQ
No comments:
Post a Comment