मुंबई: माजी कसोटीपटू आणि उद्योजक यांचे मुंबईत आज सकाळी (सोमवार) वृद्धापकालाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. आपटे यांनी सन १९५२ ते १९५३ या कालावधीत ७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी 'क्रिकेट क्लब ऑफ इंडिया'चे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे. ते मुंबईचे नगरपालही होते. आपटे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४८ साली केली. ते फलंदाज म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांची सुरुवात मात्र फिरकी गोलंदाज म्हणूनच झाली होती. एल्फिन्स्टन कॉलेजमघ्ये शिकत असताना त्यांनी विनू मंकड यांच्याकडून गोलंदाजीचे धडे घेतले. त्यांनी सर डॉन ब्रॅडमन यांना त्यांच्या शेवटच्या इनिंमध्ये १०० ची सरासरी घेण्यापासून रोखले होते. ते १९ वर्षांचे असताना त्यांनी मेरीलबोन क्रिकेट क्लब विरुद्ध भारतीय विद्यापीठांचे प्रतिनिधीत्व केले होते. हेच त्यांचे प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधील पदार्पण होते. सन १९५३ मध्ये आपटे यांची वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली. त्यावेळी ते पॉली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू ठरले. सम १९५४ मध्ये त्यांनी केवळ एकच प्रथम दर्जा क्रिकेटचा सामना खेळले. त्यानंतर त्यांची भारतीय संघासाठी कधीही निवड झाली नाही. पुढे त्यांची निवड का होऊ शकली नाही हे कायमच 'न सोडवता आलेले कोडे'च राहिले. आत्मचरित्रात केला गौप्यस्फोट त्यावेळच्या निवड समितीचे लाला अमरनाथ यांनी आपटे यांच्या वडिलांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्यांच्या दिल्लीतील कोहिनूर मिलच्या व्यावसायात भागिदारी देण्याची मागणी केली. मात्र वडिलांनी लाला अमरनाथ यांना आपले भागिदार बनवण्यास नकार दिल्याने आपली निवड होऊ शकली नाही, असा गौप्यस्फोट आपटे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. आपटे यांनी ३४ व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. आपटे डी. बी. देवधर ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळले आहेत. ते बीसीसीआयचे संस्थापक सदस्यही होते. शिवाय त्यांनी क्लब्स लेजंड क्लबचेही प्रमुखपद सांभाळले होते. आपटे हे मुंबई चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्षही होते. सध्या ते आपटे ग्रुपच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30E7uMA
No comments:
Post a Comment