पल्लेकेले: श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वाधिक विकेट्स घेणारा जगातला पहिला गोलंदाज ठरला आहे. ३६ वर्षीय मलिंगाने रविवारी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना हा इतिहास रचला. मात्र हा सामना न्यूझीलंडने पाच गडी राखून जिंकला. मलिंगाने सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत पाकिस्तानचा गोलंदाज शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला आहे. आफ्रिदीने आपल्या टी-२० करिअरमध्ये ९९ सामन्यांमध्ये एकूण ९८ विकेट्स घेतले. आता टी-२० चा कर्णधार मलिंगाचे ७४ सामन्यांमध्ये ९९ विकेट्स झाले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात लसिथ मलिंगाने २३ धावा देऊन २ गडी बाद केले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मलिंगाने या टी-२० सामन्यात पहिल्या षटकातच कोलिन मुनरोची विकेट काढत आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर त्याने ग्रँडहोमला बाद करत आपल्या ७४ व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यान नवा विक्रम केला. बांगलादेशचा शाकिब अल हसन ७२ सामन्यात ८८ विकेट्स घेऊन तिसऱ्या स्थानी आहे. भारतीय गोलंदाजांपैकी टी-२० त सर्वाधिक विकेट्सचा विक्रम आर. अश्विनच्या नावावर आहे. अश्विनने आतापर्यंत ४६ सामन्यात ५२ गडी बाद केले आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2jTQti8
No comments:
Post a Comment