<strong>पुणे :</strong> राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. पुढील धोरण ठरवण्यासाठी 5 ऑगस्टला पुण्यात कृती समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते उपस्थित असतील. धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते, आजी-माजी आमदार-खासदार आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात यावा ही प्रमुख मागणी असेल. बारामतीमधील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत 5 ऑगस्टला बैठक बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजत आहे. यासाठी राज्यभर मराठा मोर्चाकडून आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. आजच लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाने बैठक घेऊन 1 ते 9 ऑगस्टदरम्यान <a href="https://abpmajha.abplive.in/maharashtra/maratha-community-dont-have-relations-with-who-will-discuss-with-govt-says-maratha-kranti-morcha-568179">राज्यव्यापी आंदोलन</a> करणार असल्याचं जाहीर केलं. दुसरीकडे मुस्लीम आरक्षणाचं काय, असा सवाल <a href="https://abpmajha.abplive.in/maharashtra/mim-mla-sayed-imtiyaz-jaleel-asks-question-about-muslim-reservation-567968">एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील</a> यांनी उपस्थित केला. मराठा समाजाचे, धनगर समाजाचे आमदार जास्त असल्यामुळे आरक्षणाचा प्रश्न मांडतात, पण मुस्लीम आरक्षणाचं काय, असं प्रश्न जलील यांनी काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या <a href="https://abpmajha.abplive.in/mumbai/cm-devendra-fadnavis-reaction-on-maratha-resrvation-567924">सर्वपक्षीय बैठकीत</a> उपस्थित केला.
from maharashtra https://ift.tt/2AjXQXw
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात ( )चा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्य...
No comments:
Post a Comment