: बंगळुरू : आयपीएल २०२२ (IPL 2022) मेगा लिलावाचा थरार सुरू आहे. दुपारी सुरू झालेल्या या लिलावात आतापर्यंत अनेक खेळाडूंसाठी काही कोटींची बोली लागली आहे, पण काही खेळाडू असेही आहेत, ज्यांना कोणीही खरेदीदार मिळाला नाही. या यादीतील सर्वात धक्कादायक नाव होते, ते आयपीएलच्या दिग्गज खेळाडूंमध्ये गणला जाणारा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाचे. मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूला मेगा लिलावात एकही खरेदीदार मिळाला नाही. चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू असलेल्या 'चिन्ना थाला' रैनाला पहिल्या दिवशी अनसोल्ड राहावे लागले आहे. २ कोटी बेस प्राईज असलेला रैना एकेकाळी या स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज होता, पण आता त्याचे दिवस फिरले आहेत. गेल्या काही हंगामात अपेक्षेप्रमाणे त्याची कामगिरी झाली नाही, हेच यामागचे कारण असल्याचे बोलले जाते. सुरेश रैनाने 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर हंगामानंतर त्याचे प्रदर्शन चांगले होत गेले आणि तो संघाच्या यशाचा मुख्य आधारस्तंभ राहिला. चेन्नई सुपर किंग्जच्या दोन वर्षांच्या बंदीमुळे तो गुजरात लायन्ससाठी दोन हंगाम खेळला आणि त्याची जबाबदारीही घेतली. त्याच वेळी, 2018 मध्ये पुन्हा एकदा तो चेन्नई सुपर किंग्जमध्ये परतला. संघासह चार हंगामांनंतर त्याला सोडण्यात आले आणि यावेळी तो लिलावाचा एक भाग बनला, जिथे त्याला पहिल्या दिवशी कोणताही खरेदीदार सापडला नाही. रैनाच्या आयपीएल कारकीर्दीबाबत बोलायचं झालं, तर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर ५५२८ धावा आहेत. तसेच एक शतक आणि ३९ अर्धशतकेही त्याने झळकावली आहेत. रैनाप्रमाणेच आणखी एक धक्कादायक नाव आहे ते म्हणजे . ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज असलेल्या स्टीव्ह स्मिथचेही नाव मेगा लिलावात होते, पण त्यालाही पहिल्या दिवशी खरेदीदार मिळालेला नाही. रैनाप्रमाणे स्मिथचीही बेस प्राईज (मूळ किंमत) २ कोटी रुपये आहे. स्मिथ याआधी दिल्ली कॅपिटल्समधून खेळला होता. त्याला काही सामन्यात संधी मिळाली होती, पण क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे कोणीही त्याच्यासाठी बोली लावली नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/Gh8xcl2
No comments:
Post a Comment