IND vs WI : कोलकाता : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज हा एकामागून एक मोठे फटके मारत होता. तिथे भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि खेळाडू टेंशनमध्ये आले होते. पण रिषभ पंतला मात्र आनंद होत होता. पण पंत आनंदात का होता, हे कारण जेव्हा चाहत्यांना समजले तेव्हा ते त्याच्यावर चांगलेच भडकले. त्यानंतर रिषभ पंतचे डोकं ठिकाणावर आह ना, अशी प्रतिक्रीया काही चाहत्यांनी दिली आहे. पंत म्हणाला की, प्रत्येक सामन्यात खेळणे सोपे नसते, पण मला नेहमीच अशाच पद्धतीने खेळायचे होते. मी जे करतो त्याचा मला आनंद होतो. पॉवेल चेंडूला बुलेट (गोळी) सारखा मारत होता. मैदानातील सर्वांना पॉवेलचा तो झेल पकडावा असे वाटत होते. आम्हाला वाटले की, भुवी तो झेल घेईल, पण अशा गोष्टी होत राहतात. हा खेळाचा भाग आहे. दुसरीकडे मला मनातल्या मनात आनंदही होत होता, कारण पॉवेल दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे." पंतने जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा चाहते त्याच्यावर भडकले. देशाकडून खेळत असताना आयपीएलला का प्राधान्य द्यायचे, असा सवालही चाहत्यांनी उपस्थित केले आहे. सामन्यानंतर बोलताना पंत म्हणाला की, संघाला जिथे गरज असेल, त्या क्रमांकावर मी फलंदाजी करायला तयार आहे, तिथे मला कोणतीही अडचण नाही. मला खेळाची परिस्थिती आणि डेथ ओव्हर्समध्ये फलंदाजी करण्यात अडचण वाटत नाही. तुम्ही जितका सराव कराल, तितके चांगले निकाल तुम्हाला मिळत जातील. व्यंकटेशसोबतच्या भागीदारीबाबत पंत म्हणाला की, आम्ही प्रत्येक चेंडूनुसार खेळण्याचे नियोजन करत होतो. भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा पराभव केला. माजी कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक फलंदाज केलेली अर्धशतकी खेळी महत्वाची ठरली. पंत आणि व्यंकटेश अय्यर यांनी शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा जमा केल्याने टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता आली. नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या पंतला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दरम्यान, या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजलाही सुरुवातीला काही विकेट मिळाल्या, पण विराट कोहलीने चांगली फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्यानंतर रिषभ पंतने २८ चेंडूत नाबाद ५२ धावांची खेळी केल्याने टीम इंडियाला ५ बाद १८६ धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात खेळताना वेस्ट इंडिज संघाने ३ गड्यांच्या मोबदल्यात १७८ धावा केल्या. सलग दुसरा सामना जिंकत भारताने २-०ने मालिका खिशात घातली. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले अल
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/TxjlvN4
No comments:
Post a Comment