Mega Auction : बंगळुरू : एकिकडे मुंबई इंडियन्सच्या संघाने इशान किशनला संघात घेण्यासाठी तब्बल १५.२५ कोटी रुपये मोजले. पण दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माच्या लाडक्या खेळाडूला संघात स्थान देण्यात मात्र मुंबई इंडियन्सच्या संघाला अपयश आले. आगामी आयपीएल २०२२ ही खूपच रंगतदार दिसणार असल्याचे पहिल्या सत्रात दिसून आले. चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज सलामीवीर फलंदाज फाफ डू प्लेसिस आणि मुंबई इंडियन्सचा डावखुरा सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक हे देशबंधू त्यांच्या लाडक्या संघांतून यापुढे खेळताना दिसणार नाहीत. कारण या दोन्ही खेळाडूंना वेगवेगळ्या संघांनी खरेदी केले आहे. या दोघांसाठी फ्रँचायझींमध्ये स्पर्धा लागली होती. फाफ डु प्लेसिसला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तर क्विंटन डी कॉकला लखनऊ सुपर जायंट्सने खरेदी केले. आरसीबीने ७ कोटींची बोली लावत दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधार असलेल्या फाफ डु प्लेसिसला आपल्या गोटात सामील केले. फाफ डू प्लेसिसची आयपीएल कारकीर्द धमाकेदार राहिली आहे. तो एक चांगला फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि कर्णधारही आहे. गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीकडून खेळत होता. चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात फाफ डू प्लेसिससाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. फाफ होणार का आरसीबीचा कर्णधार? फाफ डू प्लेसिसला जोडण्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अनेक फायदे होणार आहेत. त्यांना सलामीसाठी चांगला आणि अनुभवी फलंदाजही मिळाला असून दुसरीकडे संघाची धुरा सांभाळण्याची जबाबदारीही ते सोपवतील असे दिसत आहे. विराट कोहलीचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण फाफ हा चांगला पर्याय आता त्यांच्यासमोर असणार आहे. दुसरीकडे, आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाजांपैकी एक असलेल्या क्विंटन डी कॉकसाठी लखनऊ सुपरजायंट्सने ६.७५ कोटी रुपयांची मोठी बोली लावली आहे. गेल्या सलग तीन मोसमात तो मुंबई इंडियन्सचा भाग होता, पण मेगा लिलावाआधी मुंबईने त्याला सोडून दिले. लखनऊ, चेन्नई आणि मुंबईने त्याच्यासाठी बोली लावली होती. आक्रमक आणि अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या डी कॉकने आयपीएलमध्ये आतापर्यंत ४ फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१३ मध्ये त्याला सनरायझर्स हैदराबादने पहिल्यांदा २० हजार डॉलरमध्ये विकत घेतले होते. २०१४ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने (दिल्ली कॅपिटल्स) त्याच्यासाठी ३.५ कोटी रुपये मोजले होते. तो या फ्रँचायझीसोबत ३ हंगाम राहिला होता. २०१८ मध्ये झालेल्या शेवटच्या मेगा लिलावात त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २.८ कोटींना विकत घेतले होते, पण २०१९ च्या लिलावापूर्वी ट्रेडिंग विंडोमध्ये त्याला मुंबईला देऊन टाकले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/tZSQkqs
No comments:
Post a Comment