कोलकाता: भारताने ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा १७ धावांनी पराभव केला आणि मालिका ३-०ने जिंकली. भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघाचा याआधी वनडे मालिकेत ३-० असा पराभव झाला होता. वेस्ट इंडिज दौऱ्यापासून रोहित शर्माने वनडे आणि टी-२० संघाचा पूर्णवेळ आणि नियमीत कर्णधार म्हणून जबाबदारी संभाळली होती. या दौऱ्यात भारताने एकही मॅच गमावली नाही. वाचा- चा पराभव भारताने पहिली टी-२० ६ विकेटनी, दुसरी टी-२० ८ धावांनी तर अखेरची टी-२० १७ धावांनी जिंकली. भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मधील हा सलग चौथा विजय ठरला. याआधी भारताने २०१८मध्ये ३-०, २०१९ मध्ये ३-०, २०१९ मध्ये २-१ आणि आता ३-० अशी मालिका जिंकली. भारताच्या या मालिका विजयासह एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. वेस्ट इंडिजचा अखेरच्या टी-२०मध्ये १७ धावांनी पराभव करताच रोहितची टीम इंडिया आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. या सामन्याआधी आयसीसी क्रमवारीत भारत २६८ गुणांसह दुसऱ्या तर इंग्लंड २६९ गुणांसह पहिल्या स्थानावर होता. आता भारत अव्वल स्थानी पोहोचला आहे. अर्थात आयसीसीकडून क्रमवारी जाहीर होईल तेव्हाच टीम इंडियाचे ताजे गुण कळतील. वाचा- ... रोहित शर्माचा मिडास टच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा टी-२०मध्ये हा सलग नववा विजय ठरला आहे. टी-२० मध्ये सलग सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या क्रमवारीत अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगाण १२ विजयांसह अव्वल स्थानी आहे. वाचा- वेस्ट इंडिजच्या नावावर झाला लाजिरवाणा विक्रम टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक पराभवाचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. त्याचा ८२ सामन्यात पराभव झालाय. भारताविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्याआधी वेस्ट इंडिजचा संघ श्रीलंकेसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. आता ते ८३ पराभवासह पहिल्या स्थानावर पोहोचले आहे. टी-२० वर्ल्डकप दोन वेळा जिंकणाऱ्या या संघावर आता हा लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेलाय. वाचा- भारताचा विक्रम भारताचा टी-२० क्रिकेटमधील हा सलग ९वा विजय आहे. याआधी भारताने जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये सलग ९ सामने जिंकले होते. आता भारताने नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात सलग ३ सामने जिंकले आहेत. भारताने गेल्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपमधील अखेरच्या ३ लढती जिंकल्या होत्या. त्यानंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडचा ३-० आणि आता वेस्ट इंडिजचा ३-० असा पराभव करत सलग ९ सामने जिंकलेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/Imynu0j
No comments:
Post a Comment