कोलकाता : भारताने पहिल्या वनडे सामन्यात सहा विकेट्स राखून दणदणीत विजय साकारला. पण या विजयानंतरही भारताचा कर्णधार रोहित शर्मा नाराज असल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर भारतीय संघाचा या एका गोष्टीमुळे पराभव होऊ शकतो, हेदेखील सांगायला रोहित विसरला नाही. सामना संपल्यावर रोहित म्हणाला की, " वेस्ट इंडिजसारख्या संघाला आम्ही १५७ धावांवर रोखू शकलो. रवी बिश्नोईने अचूक आणि भेदक मारा केला. रवी हा एक असा गोलंदाज आहे की, जो कुठल्याही क्षणी गोलंदाजी करू शकतो. आम्ही विजय साकारला, याचा आनंद आहे. पण दुसरीकडे आम्ही हा सामना एकदम सहजपणे जिंकू शकलो नाही. कारण मधल्या फळीतील फलंदाजांकडून लौकिकाला साजेशी कामगिरी होऊ शकली नाही आणि त्यावर अधिक मेहनत घेणे गरजेचे आहे. मध्यला फळीतील फलंदाजांची कामगिरी अजून सुधारणे गरजेचे आहे. आम्ही चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर अगदी सहजपणे हा विजय साकारायला हवा होता. पण तसे झाले नाही. आम्ही गोलंदाजी चांगली केली. पण फलंदाजीमध्ये मात्र आम्ही हवी तशी कामगिरी करू शकलो नाही." रोहितला या सामन्यानंतर एक गोष्ट सुचवायची होती, ती म्हणजे मध्यल्या फळीतील अनुभवी खेळाडूंकडून लौकिकाला साजेशी कामगिरी होणे अपेक्षित आहे. खासकरून विराट कोहली आणि रिषभ पंत या दोघांबद्दल रोहित म्हणाला असला तरी त्याने ते थेटपणे सांगितले नाही. कारण भारताची सुरुवात चांगली झाली होती. पण त्यानंतर विराट आणि पंत झटपट बाद झाले. त्यामुळे भारताचा डाव अडचणीत आला होता. जर सूर्यकुमार यादव मैदानात उभार राहिला नसता तर भारताचा पराभवही होऊ शकला असता. या सामन्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असला असता तर ते भारतासाठी कठीण गेले असते. त्यामुळे मधल्या फळीतील कुचकामी फलंदाजी ही भारताच्या पराभवासाठीही कारणीभूत ठरू शकते, असे रोहितला यावेळी सुचवायचे होते. त्याचबरोबर कोहली आणि पंत यांच्याकडे रोहितचा रोख होता. कारण कोहली आणि पंत सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/HOtxe01
No comments:
Post a Comment