धरमशाला : रोहित शर्माने कर्णधारपद पटकावल्यावर श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत विजय साकारला आणि एक विश्वविक्रम रचला आहे. रोहितने जी कामगिरी केली आहे ती क्रिकेट विश्वात कोणत्याही कर्णधाराला करता आलेली नाही. रोहितने कोणता विश्वविक्रम रचला, पाहा...रोहितने विश्वचषकानंतर ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद स्विकारले. त्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा न्यूझीलंडला दमदार पराभव केला होता. त्यानंतर रोहितसेनेने वेस्ट इंडिजच्या संघाला ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० अशी धुळ चारील होती, आता श्रीलंकेच्या संघाला सलग दोन ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये पराभूत केले आणि रोहित शर्माने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. मायदेशामध्ये सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने जिंकण्याचा विश्वविक्रम आता रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितने मायदेशात १७ पैकी १६ सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडचा केन विल्यम्सन आणि इंग्लंडचा इऑन मॉर्गन यांनी मायदेशात १५ ट्वेन्टी-२० सामन्यात विजय साकारले आहेत. या दोघांनाजही मागे सारत रोहित शर्माने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. विराट कोहलीने मायदेशात १३ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये विजय साकारला होता, तर महेंद्रसिंग धोनीने मायदेशात १० विजय मिळवले होते. त्यामुळे रोहित आता ट्वेन्टी-२० चा किंग झाल्याचे पाहायला मिळत आहे. श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सामना भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली जिंकत मालिकाही खिशात टाकली आहे. भारताने या मालिकेत आता २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघ आता ही मालिका गमावू शकत नाही. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तिसरा ट्वेन्टी-२० सामना रविवारी याच मैदानात होणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून रोहितसेना वेस्ट इंडिजनंतर श्रीलंकेला क्लीन स्विप देणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारतापुढे १८४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा एका धावेवर बाद झाला. पण त्यानंतर श्रेयसने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि भारताला विजय मिळवून दिला. श्रेयसला यावेळी अखेरच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजाची चांगली साथ मिळाली. श्रेयसने यावेळी ४४ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ७४ धावा फटकावल्या आणि भारताने सात विकेट्स राखत विजय साकारला. रवींद्र जडेजाने अखेरच्या षटकांमध्ये जबरदस्त फटकेबाजी करत फक्त १८ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ४५ धावांची वादळी खेळी साकारली. त्यामुळे रोहित आता अजून एक ट्वेन्टी-२० सामना जिंकून आपाल विश्वविक्रम अधिक भक्कम करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/eANuctb
No comments:
Post a Comment