कोलकाता : पहिला ट्वेन्टटी-२० सामना सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला आता एक मोठा धक्का बसला आहे. कारण भारताचा महत्वाचा खेळाडू आता संपूर्ण ट्वेन्टी-२० मालिकेत खेळणार नसल्याचे आता समोर आले आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना १६ फेब्रुवारीला कोलकाता येथे होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली होती. या सामन्यात सुंदरच्या पायातील स्नायू ताणले गेले आणि त्याला दुखापत झाली आहे. सुंदरची दुखापत ही गंभीर स्वरुपाची असून त्याला आता एकाही ट्वेन्टी-२० सामन्यात खेळता येणार नाही. याबाबतची माहिती बीसीसीआयने दिली आहे. पण सुंदरच्या जागी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार, हे मात्र बीसीसीआयने अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे आता सुंदरच्या जागी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिदविरुद्धच्या वनडे मालिकेत ३-० असा दणदणीत विजय मिळवला होता. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ आता कोलकाता येथे आज दाखल झाला आहे. कोलकातामध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्याक येणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील ही दुसरी ट्वेन्टी-२० मालिका असेल. कारण ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार विजय मिळवला होता. पण दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ हा ट्वेन्टी-२० स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. त्यामुळे रोहित शर्माची या मालिकेत कसोटी लागणार आहे. आयपीएलच्या लिलावानंतर ही मालिका होणार खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघांच्या खेळाडूंवर चाहत्यांचे खास लक्ष असेल. या लिलावात इशान किशनला सर्वाधिक १५ कोटी रुपयांची बोली लावत मुंबई इंडियन्सने आपल्या संघात दाखल करून घेतले. त्यामुळे या मालिकेत इशान किशन नेमकी कशी कामगिरी करतो आणि या लिलावाचा त्याच्या कामगिरीवर किती परीणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/GZosaKg
No comments:
Post a Comment