दुबई: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने राखलेल्या निर्विवाद वर्चस्वाचा फायदा भारतीय संघाला आणि खेळाडूंना झाला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत , कर्णधार आणि हिटमॅन यांनी टी-२० मध्ये दबदबा कायम राखला. फलंदाजांच्या क्रमवारीत तिघा भारतीयांचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका भारताने ५-० अशी जिंकली. या मालिकेत भारतीय संघाने फलंदाज, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत शानदार कामगिरी केली. जवळ जवळ प्रत्येक सामन्यात भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावलेला आणि मालिकावीर ठरलेल्या राहुलला टी-२० क्रमवारीत सर्वात मोठा फायदा झाला आहे. राहुलनेच्या क्रमवारीत चार स्थानांची वाढ होत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तो ८२३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलच्या करिअरमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. पाकिस्तानचा बाबर अझम ८७९ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. वाचा- भारताचा कर्णधार विराट कोहली ६७३ गुणांसह नवव्या स्थानावर कायम आहे. तर हिटमॅन रोहित शर्माने पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी तो १३व्या स्थानावर होता. आता तो १०व्या स्थानावर आहे. वाचा- गोलंदाजांचा विचार केल्यास जसप्रीत बुमराह २६ स्थानांनी उडी घेत ११व्या क्रमांकावर पोहोचला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळाले नाही. वाचा- न्यूझीलंडच्या मालिका विजयानंतर भारतीय संघाने पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. भारतीय संघाचे ४७ सामन्यात २६५ गुण झाले आहेत. भारताच्या पुढे इंग्लंड तिसऱ्या स्थानावर, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या तर पाकिस्तान पहिल्या स्थानावर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2u5lPHL
No comments:
Post a Comment