माउंट माउंगनुई: भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्यासह मालिका ५-०ने जिंकली. या विजयानंतर भारतीय संघाचा जल्लोष बे ओव्हल मैदानावर दिसला. भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत ५-० असा विजय मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. भारताच्या जल्लोषाचा एक व्हिडिओ भारतीय क्रिकेट संघाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज हे डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना व्हिक्ट्री डान्स असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सामना संपल्यानंतर शूट करण्यात आला होता. क्रिकेट चाहते यावर एकापेक्षा एक प्रतिक्रिया देत आहेत. वाचा- इतक्या मोठ्या विजयानंतर डान्स तर झालाच पाहिजे असे प्रतिक्रिया एका क्रिकेट चाहत्याने दिली आहे. बे ओव्हल मैदानावर झालेल्या पाचव्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने २० षटकात ३ बाद १६३ धावा केल्या. बदल्यात न्यूझीलंडला २० षटकात ९ बाद १५६ धावाच करता आल्या. भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये प्रथमच टी-२० मालिका जिंकली आहे. वाचा- मालिकेत भारताने ऑकलंड येथे पहिला आणि दुसरा सामना, तर हॅमल्टन येथे तिसरा आणि वेलिंग्टन येथील चौथ्या सामन्यात विजय मिळवला. तिसरा आणि चौथा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3b6n4a3
No comments:
Post a Comment