माउंट माँगनुई: पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने दिलेल्या व्हाईटवॉशचा बदला न्यूझीलंडने वनडे मालिकेत व्हाईटवॉशने दिला. तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने ५ विकेटनी विजय मिळवत मालिका ३-०ने जिंकली. भारताने विजयासाठी दिलेले २९७ धावांचे आव्हान न्यूझीलंडने १७ चेंडू राखून पार केले. न्यूझीलंडचा हेन्री निकोल्सला सामनावीर तर रॉस टेलरला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
भारताने केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करत २९६ धावा केल्या होत्या. विजयासाठी २९७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला मार्टिन गप्टिल आणि हेन्नी निकोल्स यांनी शानदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. गप्टिल ६६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार केन विल्यम्सनला चहलने २२ धावांवर बाद केले. पण तोपर्यंत न्यूझीलंडने सामन्यावर पकड मिळवली होती. निकोल्सने ८० धावा केल्या. त्याला शार्दुल ठाकूने बाद केले. वाचा- रवींद्र जडेजाने रॉस टेलरला १२ धावांवर बाद करून न्यूझीलंडची मोठी विकेट घेतली. पण टॉम लॅथम आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी न्यूझीलंडला सहज विजय मिळवून दिला. लॅथमने नाबाद ३२ तर कॉलिन नाबाद ५८ धावा केल्या. भारताकडून चहलने सर्वाधिक ३ विकेट तर ठाकूर आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. वाचा- त्याआधी तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय डावाची सुरूवात पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी केली. मात्र मयांक पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो एक धाव करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली देखील ९ धावांवर बाद झाला. दोन गडी बाद झाल्यानंतर पृथ्वी आणि श्रेयस अय्यर ही जोडी मैदानात होती. पृथ्वीने त्याच्या स्टाईलने आक्रमक खेळ सुरू केला. पण ४० धावांवर तो रनआऊट झाला. पृथ्वी बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ३ बाद ६२ अशी होती. त्यानंतर अय्यर आणि केएल राहुल या जोडीने भारताचा डाव सावरला. या दोघांनी धावसंख्या वाढवली आणि संघाला सुस्थितीत नेले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी १०० धावांची भागिदारी केली. अय्यर ६२ धावांवर बाद झाला. अय्यर बाद झाल्यानंतर राहुलने वनडेमधील चौथे शतक पूर्ण केले. शतकी खेळीनंतर तो ११२ धावांवर बाद झाला. त्याने ११३ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ११२ धावा केल्या. ५० षटकात भारताने न्यूझीलंडला २९७ धावांचे आव्हान दिले आहे. न्यूझीलंडकडून हमिश बेनेटने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OIJhS8
No comments:
Post a Comment