माउंट माँगनुई: भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाजी श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी केली. श्रेयसने आतापर्यंत भारतीय संघाकडून वनडेत फक्त १६ डाव खेळले आहेत. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या छोट्या करिअरमध्ये श्रेयसने एक वर्ल्ड रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला. न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ बाद २९६ धावा केल्या. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ११२ धावा केल्या. तर श्रेयसने ६३ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. पहिल्या सामन्यात श्रेयसने शतकी खेळी केली होती आणि त्यानंतरच्या दोन सामन्यात अर्धशतक झळकावले. वाचा- भारतीय संघाला चौथ्या क्रमांकासाठी मिळालेला भरवशाचा फलंदाज म्हणून श्रेयसकडे पाहिले जात आहे. त्याने तिसऱ्या सामन्यात अर्धशतक करून क्रिकेटमधील वर्ल्ड रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला. आतापर्यंत १६ डावात सर्वाधिक सरासरीचा विक्रम ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज यांच्या नावावर होता. त्यांनी ५०च्या सरासरीने १६ डावात ८ अर्धशतकांच्या केली होती. हा विक्रम अय्यरने मागे टाकला. अय्यरने ५६. २५ च्या सरासरीने १६ सामन्यात एक शतक आणि ८ अर्धशतक झळकावले. अय्यरने चॅपल यांचा ४१ वर्ष जुना विक्रम मागे टाकला. आतापर्यंत सरासरीचा विचार करता चॅपल सर्वात पुढे होते. पण अय्यरने १६ डावात ५६.२५ च्या (१ शतक ८ अर्धशतक) सरासरीने चॅपल यांना मागे टाकले. चॅपल यांनी १६ डावात ५०च्या सरासरीने धावा केल्या होत्या. वाचा- इतक नव्हे तर ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अय्यरने स्वत:च्या नावावर केला. भारताकडून युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध २०१७ मध्ये २१० धावा, तर राहुल द्रवीडने २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध २००९ धावा केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39qTSsU
No comments:
Post a Comment