मेलबर्न: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १६ नोव्हेंबर २०१३ रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर गेल्या साडेपाच वर्षात सचिन कधीच मैदानात फलंदाजी करताना दिसला नाही. ऑस्ट्रेलियात झालेल्या एका सामन्यात सचिनला पुन्हा एकदा मैदानात फलंदाजी करताना पाहण्याचा योग चाहत्यांना आला. वाचा- ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदानावर झालेल्या बुश फायर रिलीफ फंड सामन्यात पहिल्या डावानंतर सचिनने मधल्या ब्रेकमध्ये बॅट हातात घेतली. सचिनने ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू अॅलिस पॅरीची एक ओव्हर खेळली. शनिवारीच सचिनने पॅरीने दिलेले एक ओव्हर खेळण्याचे आव्हान स्विकारले होते. बुश फायर सामन्यात पॉन्टिंग संघाची फलंदाजी झाल्यानंतर सचिनने महिला क्रिकेट संघाचा सामना केला. जगातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना साडेपाच वर्षानंतर सचिनला पुन्हा एकदा मैदानात बॅटिंग करताना पाहता आले. वाचा- पॅरीने सचिनला चार चेंडू टाकले. त्यातील दोन चेंडूवर सचिनने स्क्वेअर लेगला चौकार मारले. त्याशिवाय सचिनने एक स्टेट ड्राईव्ह आणि एक कव्हर ड्राईव्ह देखील मारला. सचिनने पहिल्या चेंडूवर चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. तिसऱ्या चेंडूवर सचिनला धाव घेता आली नाही. चौथ्यावर सचिनने चौकार मारला. त्यानंतर अखेरचे दोन चेंडू अॅनाबेल सदरलँडने टाकले. सचिनच्या या फलंदाजीचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच जगभरातील क्रिकेट चाहते देखील सचिनच्या हा फलंदाजीबद्दल सोशल मीडियावरून व्यक्त होत आहेत. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bkG8Bv
No comments:
Post a Comment