नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बुश फायर रिलीफ सामन्यासाठी अनेक दिग्गज खेळाडू एकत्र येत आहेत. या सामन्यातील एका संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार करणार आहे. तर या संघाचे प्रशिक्षक म्हणून मास्टर ब्लास्टर असणार आहे. दोन्ही खेळाडू सामन्याच्या आधी सरावासाठी एकत्र आले. या दोन दिग्गज खेळाडूंचा एक व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सचिन आणि पॉन्टिंग यांनी मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७१ शतक तर ६१ हजार ८४० धावा केल्या आहेत. दोघांनी क्रिकेट चाहत्यांना अनेक आनंदाचे क्षण दिले आहेत. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० तर पॉन्टिंगच्या नावावर ७१ शतकांची नोंद आहे. बुश फायर सामन्यात सचिन पॉन्टिंगच्या संघाचा कोच असेल. पॉन्टिंग संघाची लढत गिलख्रिस्ट संघाविरुद्ध होणार आहे. सामन्यात गिलख्रिस्ट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2tH9rgF
No comments:
Post a Comment