दुबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीत फलंदाजांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी त्यांचे पहिले आणि दुसरे स्थान कायम राखले आहे. गोलंदाजांमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराहला खराब कामगिरीचा फटका बसला तर अष्ठपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाने क्रमवारीत सुधारणा केली. वाचा- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर आयसीसीने क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजांमध्ये पहिल्या तीन स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विराट, रोहित आणि पाकिस्तानचा बाबर अझम हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत सामनावीर पुरस्कार मिळवणारा रॉस टेलर चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा डी कॉकच्या कामगिरीत सुधारणा होत तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे. वाचा- गोलंदाजांचा विचार करता गेल्या काही आठवड्यांपासून पहिल्या स्थानावर असेलल्या भारताच्या जसप्रीत बुमराहला अव्वल स्थान गमवावे लागले आहे. बुमराहला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत एकही विकेट घेता आली नाही. बुमराहची जागा ट्रेंट बोल्टने घेतली आहे. बोल्ट ७२७ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर बुमराह ७१९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला. बुमराह वगळता पहिल्या १० मध्ये एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही. वाचा- अष्ठपैलू खेळाडूंचा विचार करता भारताच्या रवींद्र जडेजाने २४६ गुणांसह सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. जडेजा क्रमवारीत ३ स्थानांची वाढ झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील कामगिरीचा त्याला फायदा झाला. अष्ठपैलूच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी ३०१ गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने इंग्लंडच्या बेन स्ट्रोक्सला मागे टाकले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HhXyAY
No comments:
Post a Comment