दुबई: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या स्पर्धेत एक नवा नियम लागू गेला जाणार आहे. २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत देण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचावर दिली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच एका मोठ्या स्पर्धेत हा नियम लागू केला जाणार आहे. याआधी आयसीसीने भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत हा नियम प्रायोगिक तत्वावर लागू केला होता. वाचा- येत्या २१ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत थर्ड अंपायर गोलंदाजाच्या प्रत्येक चेंडूवर नजर ठेवणार आहे. गोलंदाजाचा पाय रेषे बाहेर पडल्यास तो थर्ड अंपायरकडून नो बॉल ठरवला जाईल. यासंदर्भातील माहिती तातडीने मैदानावर असलेल्या अंपयरला दिली जाईल. वाचा- या नियमाचा प्रयोग भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत यशस्वीपणे झाला होता. त्यामुळेच आयसीसीने महिला वर्ल्ड कप मध्ये याचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा- आयसीसीने आतापर्यंत १२ सामन्यात असा प्रयोग केला आहे. यात एकूण ४ हजार ७१७ चेंडू टाकण्यात आले होते. त्यापैकी १३ नो बॉल होते. आयसीसीचे जनरल मॅनेजर जेफ अल्ड्राइस म्हणाले, सामन्यात अशा प्रकारची मदत घेतली गेल्यास चुका कमी होतील. यामुळे मैदानावरील पंच नो बॉल संदर्भातील निर्णय घेणार नाहीत. अन्य नो बॉल संदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार मात्र त्यांच्याकडेच असेल. हे देखील वाचा- टी-२० वर्ल्ड कप आणि भारत आयसीसीने स्पर्धेसाठी दोन ग्रुप केले असून भारतीय संघाचा समावेश ए ग्रुपमध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश यांचा समावेश आहे. स्पर्धेतील भारताच्या लढती २१ फेब्रुवारी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया २४ फेब्रुवारी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया २७ फेब्रुवारी- भारत विरुद्ध न्यूझीलंड २९ फेब्रुवारी- भारत विरुद्ध श्रीलंका
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Sz5Euq
No comments:
Post a Comment