मेलबर्न: ऑस्ट्रेलियात बुश फायर रिलीफ फंडसाठी झालेल्या सामन्यात रिकी पॉन्टिंगच्या संघाने अॅडम गिलख्रिस्टच्या संघावर एक धावाने सनसनाटी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून गिलख्रिस्ट संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पॉन्टिंग संघाने प्रथम फलंदाजी करत १० षटकात ५ बाद १०४ धावा केल्या. पॉन्टिंगच्या संघाकडून वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने सर्वाधिक ३० धावा केल्या. त्याने ११ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३० धावा केल्या. तर कर्णधार पॉन्टिंगने नाबाद २६ धावा केल्या. याशिवाय मॅथ्यू हेडनने १६ धावांचे योगदान दिले. वाचा- गिलख्रिस्ट संघाकडून वेस्ट इंडिजचा दिग्गज गोलंदाज कोर्टनी वॉल्श, भारताचा युवराज सिंग आणि ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू सायमंड्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. वाचा- विजयासाठी १०५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या गिलख्रिस्ट संघाला १० षटकात ६ बाद १०३ धावांपर्यंत मजल मारता आली. गिलख्रिस्ट संघाकडून शेन वॉटसन याने सर्वाधिक ९ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३० धावा केल्या. सायमंड्सने १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह २९ धावा केल्या. वाचा- या सामन्यात भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रिकी पॉन्टिंग संघाचा प्रशिक्षक होता. या सामन्याच्या तिकीट विक्रीतून मिळालेला पैसा ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीतील पीडितांना दिला जाणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2H4i4Fh
No comments:
Post a Comment