बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची खरी ओळख राजकीय नेता अशी असेल तरी पवारांचा वावर हा प्रत्येक क्षेत्रात असतो. पवारांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पदांवर काम केले आहे. क्रिकेट बाबत बोलायचे झाल्यास पवारांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनपासून ते भारतीय क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीचे अध्यक्षपद देखील सांभाळले आहे. याशिवाय ते खो-खो, कुस्ती संघटनेचे देखील अध्यक्ष आहेत. पवारांनी त्यांच्या शहराची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या बारामती शहरात बुधवारपासून क्रीडा क्षेत्रातील एका नव्या पर्वाला सुरूवात झाली. बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बुधवारपासून सामन्याला सुरूवात झाली. महाराष्ट्र विरुद्ध उत्तारखंड यांच्यातील सामना बुधवारी सुरू झाला. सामना सुरू होण्याआधी पवारांच्या हस्ते सत्कार कार्यक्रम देखील झाला. पवारांनी या कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सामन्याचे उद्घाटन करताना समाधान वाटले. प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देशांत सर्वदूर आयोजित होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे पवारांनी म्हटले. वाचा- बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात रणजी सामन्याचे आयोजन करण्यासंदर्भात बीसीसीआयच्या समितीने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पाहणी केली होती. त्यानंतर डॉ.आंबेडकर मैदानाला प्रथम श्रेणी सामन्याचा दर्जा देण्यात आला. सामन्यात उत्तराखंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या १० षटकात महाराष्ट्राने ५ बाद २९ धावा केल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HgMeFk
No comments:
Post a Comment