Ads

Monday, February 24, 2020

सचिनच्या वर्ल्ड रेकॉर्डमुळे वेबसाइट क्रॅश झाल्या होत्या

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे हा प्रकार सुरू होऊन ३९ वर्षे झाली होती. २ हजार ९६२ सामने खेळून झाले होते. पण ५० षटकांच्या या प्रकारात कोणत्याही फलंदाजाला द्विशतकी खेळी करता आली नाही. पण गॉड ऑफ क्रिकेट अशी ओळख असलेल्या सचिनने ३००हून अधिक वनडे सामने खेळले होते. त्याला देखील २०० धावा करता आल्या नव्हत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४ फेब्रुवारी २०१० या तारखेला म्हणजे आजपासून १० वर्षापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये कोणी द्विशतक करू शकते ही गोष्ट सत्यात उतरली. भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले. सचिनच्या आधी अनेक फलंदाज द्विशतकाच्या जवळ पोहोचले होते. पण कोणालाही २०० धावांचा टप्पा गाठता आला नाही. सचिनने द्विशतक केल्यानंतर मग द्विशतकाचा सिलसिलाच सुरू झाला. वाचा- सचिनच्या आधी जागतिक क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने १९९७ साली द्विशतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने डेनमार्कविरुद्ध २२९ धावा केल्या होत्या. क्लार्कने १५५ चेंडूत २२ चौकारांच्या मदतीने द्विशतक केले होते. त्यानंतर १३ वर्षांनी पुरुषांच्या वनडेमध्ये सचिनने द्विशतक पूर्ण केले. वाचा- सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ग्वालियर येथील कॅप्टन रुप सिंह स्टेडियमवर ही कामगिरी केली. कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची पहिली विकेट २५ धावांवर पडली. त्यानंतर सचिनने दिनेश कार्तिकसह १९४ धावांची भागिदारी केली. कार्तिक बाद झाल्यानंतर सचिनने युसुफ पठाणसह छोठी भागिदारी केली. सचिनने १४७ चेंडूत २५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद २०० धावा केल्या. या सामन्यात सचिनचा स्ट्राइकरेट १३६.०५ इतका होता. या सामन्यात धोनीने ३५ चेंडूत ६८ धावांची वादळी खेळी केली होती. सचिनच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने ४०१ धावा केल्या. या सामन्यात भारताने १५३ धावांनी विजय मिळवला होता. वाचा- वेबसाइट बंद पडली जेव्हा सचिन १९८ धावांवर खेळत होता तेव्हा ईएसपीएन ही क्रिकेटचा लाईव्ह स्कोअरकार्ड देणारी वेबसाइट बंद पडली होती. २०१० मध्ये या वेबसाइटचे पेज एकाच वेळी ५५ लाख लोकांनी ओपन केले होते. वाचा- सचिननंतर सुरू झाली मालिका... २०१० मध्ये सचिनच्या द्विशतकानंतर विरेंद्र सेहवागने २०११ मध्ये २१९, २०१३ मध्ये रोहित शर्माने २०९ पुन्हा २०१४ मध्ये २६४ धावांची द्विशतकी खेळी केली. २०१५ मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत ख्रिस गेलने २१५ धावा केल्या. त्यानंतर एका महिन्याने न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने २३७ धावांची खेळी केली. २०१७ मध्ये रोहितने पुन्हा एकदा २०८ धावा करत तिसरे द्विशतक केले. २०१८ मध्ये पाकच्या फखर जमा याने २१० तर न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू एमलिया केर हिने २३२ धावांची द्विशतकी खेळी केली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38TUIOF

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...