माउंट माउंगनुई: भारताचा हिटमॅन रोहित शर्माने रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात एक खास रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करण्याचा विक्रम रोहितने केला. माउंट माउंगनुई येथे सुरु असलेल्या सामन्यात रोहितने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ६० धावा केल्या. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. रोहितने न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मधील अर्धशतक झळकावले. रोहितने टी-२० मध्ये २५ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. या सामन्यात रोहित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करण्याबाबत रोहितने विराट कोहलीला मागे टाकले. वाचा- विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये २४ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल आणि पॉल स्टर्लिंग यांनी प्रत्येकी १७ वेळा अशी कामगिरी केली. तर ऑस्ट्रेल्याच्या डेव्हिड वॉर्नरने १५ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. वाचा- पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात विराट कोहलील विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे नेतृत्व करत होता. रोहितने ४१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावा केल्या. पण दुखापतीमुळे तो क्षेत्ररक्षणासाठी आला नाही. त्याच्या ऐवजी केएल राहुलने कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Up4T9w
No comments:
Post a Comment