नवी दिल्ली: राजकीय संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने गेली अनेक वर्ष बंद आहेत. दोन्ही संघ आयसीसी द्वारे आयोजित स्पर्धामध्ये एकमेकांविरुद्ध लढतात. पाकिस्तानची भारतासोबत क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. पण भारताकडून दहशतवादाच्या मुद्द्यावरून नेहमी नकार दिला जातो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात जास्तीत जास्त क्रिकेट स्पर्धा झाल्या पाहिजेत, असे मत माजी क्रिकेटपटू सिक्सर किंग युवराज सिंगने व्यक्त केले आहे. युवराजसह पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने देखील दोन्ही देशांनी क्रिकेट सामने खेळल्यास अधिक फायदा होईल, असे म्हटले आहे. वाचा- स्पोर्ट्स ३६० सोबत बोलताना युवराज म्हणाला, मला पाकिस्तान सोबतच्या २००४, २००६ आणि २००८ मधील द्विपक्षीय मालिका आठवतात. पण केल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये क्रिकेट सामने होत नाहीत. अर्थात ही गोष्ट आमच्या हातात नाही. आम्ही स्वत: क्रिकेट खेळत असल्यामुळे आम्हाला त्याबद्दलची वेगळी भावना असते. पण आम्ही हे ठरवू शकत नाही की कोणत्या देशाविरुद्ध खेळायचे. भारत- पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळले तर ते क्रिकेटसाठी अधिक चांगले असेल असे, युवराज म्हणाला. वाचा- भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा क्रिकेट सामने व्हावेत असे मत माांडणारे युवराज आणि आफ्रिदी या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. दोन्ही खेळाडू सध्या टी-२० लीग स्पर्धेत भाग घेतात. आफ्रीदीच्या मते यांच्यात मालिका झाल्यास ती अॅशेसपेक्षा मोठी असेल. पण अशी संधी मिळत नाही. आपण खेळाच्या मध्ये राजकारण आणतो. भारत-पाक यांच्यात २०१३ नंतर एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. २००८ मध्ये दोन्ही संघांमध्ये अखेरची कसोटी मालिका झाली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37jRbb1
No comments:
Post a Comment