कराची: संघात निवड होण्यासाठी खेळाडू चांगली कामगिरी करून निवड समीतीच्या नजरेत येत असतात. पण एका क्रिकेटपटूने संघात निवड न झाल्याबद्दल आपली नारजी व्यक्त करण्यासाठी भर मैदानात सर्वांसमोर कपडे काढले. क्रिकेटमधील या घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. वाचा- आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडणारा पाकिस्तानचा स्टार विकेटकीपर याच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. रिपोर्ट्सनुसार उमर नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस टेस्ट देण्यासाठी आला होता. पण तो टेस्ट पास होऊ शकला नाही. फिटनेस टेस्टमध्ये उमरच्या शरीरातील फॅट तपासण्यात आले. त्यात तो पास झाला नाही. या गोष्टीवरून संतापलेल्या उमरने ट्रेनर समोरच संपूर्ण अंगावरील कपडे काढले. वाचा- उमर फक्त कपडे काढून थांबला नाही. त्याने ट्रेनर सोबत वाद घातला. उमरने मैदानावर सर्व जण असताना कपडे काढले आणि विचारले कुठे आहे फॅट सांगा? या घटनेनंतर फिटनेस चाचणी घेणाऱ्या टीमने उमरची तक्रार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे केली आहे. उमरच्या या गैरव्यवहारामुळे त्याच्यावर बंदी घातली जाऊ शकते किंवा पुढील मालिकेतून वगळण्यात येऊ शकते. उमरचा मोठा भाऊ कामरान आणि माजी कर्णधार सलमान बट्ट देखील फिटनेस टेस्टमध्ये पास होऊ शकले नाहीत. वाचा- स्वत:च्या चुकीच्या वर्तणुकीमुळे चर्चेत येण्याची उमरची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील तो अनेक वेळा वादात अडकला आहे. २०१७मध्ये त्याच्या वर्तणामुळे इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून त्याला माघारी पाठवण्यात आले होते. तेव्हा देखील तो फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला होता. तत्कालीन कोच मिकी आर्थरने उमरवर कारवाई केली होती. वाचा- उमरसह कामरान आणि माजी कर्णधार सलमान बट्ट देखील फिटनेस टेस्टमध्ये पास होऊ शकले नाहीत. कामरानला अनेक वेळा फिटनेस टेस्टसाठी बोलवण्यात आले होते. पण तो टेस्ट देण्यास टाळत होता. अखेर २८ जानेवारी रोजी तो टेस्ट देण्यासाठी आला. पण तो पास होऊ शकला नाही. सलमान बट्टने देखील फिटनेस टेस्ट पूर्ण केली नाही. फिटनेस टेस्ट अर्धवट सोडून तो निघून गेला. त्याच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. या तिनही खेळाडूंना पीसीबीकडून करार मिळालेला नाही. इतक नव्हे तर त्यांच्या स्थानिक संघाने देखील या तिघांना करारबद्ध केले नाही. सध्या उमर, कामरान आणि बट्ट हे कोणत्याही कराराशिवाय खेळत आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/383PorX
No comments:
Post a Comment