अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान म्हणून मोटेराला लवकरच मान्यता मिळेल. पण त्याआधी हे स्टेडियम वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागताचा कार्यक्रम या मैदानावर होत आहे. मोटेराच्या सरदार पटेल स्टेडियमवर नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम होणार आहे. यात डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान अशी ओळख होण्याआधी देखील हे मैदान प्रसिद्ध होते. या मैदानावर अनेक दिग्गज खेळाडूंनी वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. ज्यात सुनील गावसकर आणि कपील देव यांचा देखील समावेश आहे. वाचा- ज्या मोटेरा मैदानाची चर्चा आज ट्रम्प यांच्या स्वागतामुळे होत आहे. पण याच मैदानावरील वर्ल्ड रेकॉर्ड अनेकांना आज लक्षात नसतील. जाणून घ्या या मैदानावरील विक्रम... १९८३ साली गुजरात सरकारद्वारे देण्यात आलेल्या १०० एकर जमीनीवर हे मैदान बांधण्यात आले होते. या मैदानावर भारताचे दिग्गज फलंदाजी सुनील गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १० हजारचा टप्पा पार केला होता. वाचा- तर १९८३ मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या कपील देव यांनी न्यूझीलंडचे गोलंदाज रिचर्ड हेडली यांच्या सर्वाधिक कसोटी विकेटचा वर्ल्ड रेकॉर्ड मागे टाकला होता. याच मैदानावर सुनिल गावसकर १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या. जागतिक क्रिकेटमध्ये प्रथमच अशी कामगिरी एखाद्या फलंदाजाने केली होती. तर कपील देवने हेडली यांचा ४३१ विकेटचा विक्रम मागे टाकत ४३२वी विकेट याच मैदानावर घेतली होती. वाचा- भारताच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या या मैदान आज नव्याने बांधण्यात आले आहे. या मैदानावर एकाच वेळी १ लाख १० हजार प्रेक्षक सामना पाहू शकतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2v1h4PV
No comments:
Post a Comment