काठमांडू: नेपाळच्या संघाने बुधवारी वनडे क्रिकेटमधील विश्वविक्रम केला. फिरकीपटू संदीप लामीछानेच्या शानदार कामगिरीच्या जोरावर नेपाळने अमेरिकेचा अवघ्या ३५ धावांवर ऑल आऊट केला. वनडे क्रिकेटमध्ये एखाद्या संघाचा हा सर्वात कमी स्कोअर ठरला आहे. नेपाळच्या संघाने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात नवा विक्रम नोंदवला. नाणेफेक जिंकून नेपाळने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अमेरिकेचा १२ षटकात ऑल आऊट केला. अमेरिकेकडून जेव्हियर मार्शलने सर्वाधिक १६ धावा केल्या. मार्शल वगळता अमेरिकेच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. वाचा- नेपाळकडून टाकण्यात आलेल्या १२ पैकी ६ षटके एकट्या संदीपने टाकल्या. त्याने १६ धावा देत ६ विकेट घेतल्या. नेपाळने विजयाचे लक्ष्य ५.२ षटकात २ विकेटच्या बदल्यात पार केले. हा सामना फक्त १७.२ षटकात संपला. वाचा- वाचा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम अमेरिकेच्या नावावर नोंदवला गेला आहे. याआधी हा विक्रम झिम्बब्वेच्या नावावर होता. त्यांनी २००४ मध्ये ३५ धावा केल्या होत्या. पण त्यासाठी झिम्बाब्वेने १३.५ षटके खेळली होती. नेपाळने अमेरिकेचा १२ षटकात ऑल आऊट केला. या क्रमवारीत कॅनडाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी २००३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध फक्त ३६ धावा केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/31X8gGR
No comments:
Post a Comment