नवी दिल्ली/ माउंट माउंगनुई: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने ४-० अशी विजय आघाडी घेतली आहे. या मालिकेत विराट कोहलीने पहिल्या तीन सामन्यात कोणताही बदल केला नाही. मालिका विजयानंतर चौथ्या सामन्यात विराटने तीन बदल केले. पण तेव्हा देखील विकेटकीपर ऋषभ पंतला संघात संधी मिळाली नाही. आता पाचव्या सामन्यात देखील पंतला संधी मिळाली नाही. विराटने स्वत: विश्रांती घेतली त्याऐवजी रोहित शर्माकडे कर्णधापद देण्यात आले. पंतचा संघात समावेश न केल्याबद्दल विरेंद्र सेहवागने देखील नाराजी व्यक्त केली होती. जाणून घेऊयात पंतला कर्णधार, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापन संघात का स्थान देत नाहीत.... पंतची सर्वात मोठी चूक ऋषभ पंतवर होत असलेला सर्वात मोठा आरोप अथवा टीका म्हणजे जेव्हा संघाला त्याच्याकडून चांगल्या खेळीचा अपेक्षा असते तेव्हा तो खराब शॉट खेळून विकेट टाकतो. असे नाही की पंत चांगली सुरूवात करत नाही. पण सामना जिंकून देणारी खेळी करण्यात त्याला यश आले नाही. फक्त भारतीय संघाकडून नाही तर आयपीएलमध्ये देखील असे पाहायला मिळाले आहे. पंतवर सातत्याने टीका होत असली तरी , प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुलीने नेहमी त्याची बाजू घेतील आणि त्याला संधी देखील दिली आहे. वाचा- ... म्हणून विराट आणि संघ व्यवस्थापनाने घेतला कठोर निर्णय ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात आयसीसी टी-२० वर्ल्ड कप होत आहे. वर्ल्ड कपसाठी मुख्य संघ निवडण्यासाठी भारतीय संघाकडे अतिशय कमी वेळ आहे. पंत सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळेच विराटने संजू सॅमसनला संधी द्यावी लागली. पण संजू देखील फार चांगली कामगिरी करत आहे असे दिसत नाही. श्रीलंकेविरुद्ध तो ६ तर न्यूझीलंडविरुद्ध ८ आणि २ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईतील सामन्यात पंतच्या हेल्मेटला चेंडू लागल्यामुळे राहुलने विकेटकीपर म्हणून जबाबदारी पार पाडली. विराटचा हा हुकमी इक्का ठरला. विकेटकीपर म्हणून राहुल शानदार कामगिरी करत आहे तर फलंदाज म्हणून तो विजय मिळवून देत आहे. त्यामुळेच विराटला मनीष पांडेला संधी द्यावी लागली आणि त्यानेही अर्धशतकी करत संघाला विजय मिळून दिला. ऑगस्ट २०१९पासून एकही अर्धशतक नाही पंतने २८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील २५ डावात ४१० धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ६५ ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे. ही खेळी त्याने ६ ऑगस्ट २०१९ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. त्यानंतर पंतने एकदाही ५० धावा केल्या नाहीत. पंतने अखरेच्या आठ डावात ४,१९,२७,६,१८,३३*,० आणि १* धावा केल्या आहेत. वाचा- १६ वनडेत फक्त एक अर्धशतक वनडे क्रिकेटचा विचार केल्यास पंतने १६ सामन्यात एका अर्धशतकासह ३७४ धावा केल्या आहेत. वनडेतील अर्धशतक १५ डिसेंबर २०१९ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध केले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ७१ धावानंतर त्याने एकही मोठी खेळी केली नाही. त्याला अनेक वेळा वरच्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. पण चांगली सुरूवात केल्यानंतर खराब शॉट खेळून तो बाद झाला. विकेटकीपिंगवर देखील प्रश्नचिन्ह पंत त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. धोनीचा पर्याय म्हणून सुरूवातीपासून त्याच्याकडे पाहिले जाते. पण त्याच्या विकेटकीपिंगवर नेहमीच प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातात. फलंदाजांना बाद करण्याच्या अनेक संधी त्याने सोडल्या आहेत. कसोटीमध्ये ज्या पद्धतीने पंतने चांगली कामगिरी केली आहे तशीच वनडे आणि टी-२० मध्ये देखील अपेक्षित आहे. वाचा- अनेक जाण आहेत रांगेत वनडे आणि टी-२० मध्ये पंत हाच विराटची पहिली पसंद होती. पंत शिवाय संजू सॅमसन, श्रीकर भारत, इशांन किशन आणि अंकुश बैस हे विकेटकीपर देखील आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी संधीची वाट पाहत आहेत. याशिवाय वृद्धिमान साहा आणि राहुल हे पर्याय देखील विराटकडे आहेत. वर्ल्ड कपपासून विश्रांती घेललेल्या धोनीने कमबॅक केले तर तो पंत नव्हे तर अन्य कोणालाही विकेटकीपर म्हणून संधी मिळणार नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/31jJyje
No comments:
Post a Comment