: राज्याच्या राजकारणाचं महत्त्वाचं केंद्र असलेली बारामती आता नव्या कारणासाठी ओळखली जाणार आहे. बारामतीत नव्याने तयार झालेल्या क्रिकेट स्टेडिअमवर पहिला रणजी सामना खेळवण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमवर पहिला रणजी सामना महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड यांच्यात १२ ते १५ फेब्रुवारीदरम्यान होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने बारामतीच्या मैदानावर रणजी सामने खेळवण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यानंतरचा हा पहिलाच सामना आहे. ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी हे खेळाडू या सामन्यात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतील. बारामतीच्या क्रिकेट स्टेडिअमसाठी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या पुढाकारातून या मैदानाचं नूतनीकरण करण्यात आलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, वसिम जाफर यांसारख्या दिग्गजांच्या उपस्थितीत या स्टेडिअमचं लोकार्पण करण्यात आलं होतं. लोकार्पण करतानाच मुंबई आणि महाराष्ट्र संघांमध्ये ट्वेन्टी-ट्वेन्टी सामनाही खेळवण्यात आला होता. मुंबईतील वानखेडे स्टेडियमपेक्षाही हे स्टेडियम मोठे असल्याचं सांगितलं जातं. भविष्यात या मैदानावर आंतराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळवण्यात येतील, लोकार्पणावेळीच जाहीर करण्यात आलं होतं.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39mnU0D
No comments:
Post a Comment