मुंबई: दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत भारताच्या याने सर्वाधिक धावा करत सामनावीर पुरस्कार मिळवला. अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध यशस्वीने ८० धावांची खेळी केली. पण भारतीय संघाला पाचवे विक्रमी विजेतेपद मिळवता आले नाही. स्पर्धा संपल्यानंतर भारतात आलेल्या यशस्वीला एक गिफ्ट स्विकारण्यास सांगितले. पण मुंबईकडून खेळणाऱ्या या खेळाडूने त्यास नकार दिला. यशस्वीचे प्रशिक्षक ज्वाला सिंह यांनी त्याला एक गाडी गिफ्ट देणार होते. यशस्वीने प्रशिक्षक सिंह यांना स्वत:ची जुनी गाडी देण्यास सांगितले आणि त्यांना स्वत:ला नवी गाडी घेण्याची विनंती केली. यशस्वीने वर्ल्ड कप स्पर्धेत ४०० धावा केल्या. भारतीय संघाचा भविष्यातील स्टार म्हणून यशस्वीकडे पाहिले जात आहे. १८ वर्ष होण्याची वाट पाहत होते यशस्वीचे प्रशिक्षकांनी अचानक गाडी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला नाही. प्रचंड जड क्रिकेटची बॅट घेऊन त्याला मैदानावर जावे लागते. त्याचा त्रास कमी करण्यासाठी सिंह यांनी गाडी गिफ्ट देण्याचा विचार केला. पण त्याला १८ वर्ष पूर्ण झाली नव्हती. गेल्या वर्षी २८ डिसेंबर रोजी यशस्वीने १८ वर्ष पूर्ण केली. आता यशस्वीला गाडी चालवण्याचा परवाना मिळेल असा विचार करून सिंह यांनी गाडी घेण्याचा विचार केला. पण तेव्हा तो वर्ल्ड कपची तयारी करत होता. यशस्वी जेव्हा आफ्रिकेसाठी रवाना झाला; तेव्हा मी त्याला सर्वाधिक धावा केल्यास एक गाडी गिफ्ट देईन, असे सांगितल्याचे सिंह म्हणाले. प्रशिक्षकांनी दिलेले चॅलेंज यशस्वीने पूर्ण केले आणि मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. १७ वर्ष २९२ दिवसात विजय हजारे ट्रॉफी आणि लिस्ट ए वनडे सामन्यात द्विशतक झळकावणारा यशस्वी जागातील सर्वात तरुण फलंदाज आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ULJHL9
No comments:
Post a Comment